बीयर पाजून अल्पवयीन मुलीवर फ्लॅटवर अत्याचार, गुप्तांगातून रक्तस्त्राव

सुशांत काळे

• 07:27 PM • 16 Nov 2026

Crime News : एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा दुर्दैवी प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत आरोपीची विशाल किरार अशी ओळख समोर आली. आरोपीने पीडितेला बीयर पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना आहे.

MumbaiTak
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

बीयर पाजून अल्पवयीन मुलीवर फ्लॅटवर अत्याचार

point

पीडितेच्या गुप्तांगातून रक्तस्त्राव 

Crime News : एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा दुर्दैवी प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत आरोपीची विशाल किरार अशी ओळख समोर आली. आरोपीने पीडितेला बीयर पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना आहे. पोलिसांनी केवळ 48 तासांत आरोपीला अटक केल्याची माहिती समोर आली. हा लज्जास्पद प्रकार मध्य प्रदेशातील भोपाळलगतच्या विदिशा येथील मुखर्जीनगर परिसरातील मेडिकल कॉलेजच्या एका विद्यार्थ्याच्या फ्लॅटवर घडला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : अगं बाई...! कोल्हापुरात 6 डझन रत्नागिरी हापूस अंब्याचा भाव 55,000 रुपयांना

पीडितेच्या गुप्तांगातून रक्तस्त्राव 

पीडितेच्या गुप्तांगातून रक्तस्त्राव होऊ लागल्यानंतर तिला मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेडिकल कॉलेजच्या एका विद्यार्थ्यासह इतर दोन तरुणांनी तिला रुग्णालयात आणले. मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे कळताच, पोलीस रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांनी प्रकरणाचा तपास केला. मात्र, सुरुवातीच्या टप्प्यात गुन्हा दाखल न झाल्याने पोलिसांच्या कृतीवर प्रश्न निर्माण होतोय. 

आरोपीवर पॉक्सो गुन्हा

या प्रकरणात राष्ट्रीय मानवाधिकारी आयोगाचे सदस् प्रियांक कानूंगे यांनी त्यांच्या पूर्वीच्या अकाउंटवर पोस्ट करून पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. त्यानंतर पोलिसांनी कारवाई अधिक कठोर केली. त्यानंतर आरोपी विशाल किरार विरुद्ध भारतीय न्याय दंड संहिता अंतर्गत पॉक्सो गुन्हा दाखल करण्यात आला. 

हे ही वाचा : घराबाहेर खेळत होती 3 वर्षीय मुलगी, अल्पवयीन मुलांकडून अत्याचार

पोलिसांच्या तपासातून या घटनेत वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचा कोणताही सहभाग उघड झालेला नाही. याच्या आधारे, केवळ एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस संबंधित घटनेचा तपास करत आहेत.