ऑनलाईन कर्ज घेतलं अन् फसला, पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या का केली?

पृथ्वीराज पाटील

• 07:11 AM • 16 Nov 2026

हैदराबादमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका पोलीस कॉन्स्टेबलने ऑनलाईन फ्रॉडच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या

point

पोलिसांनी काय सांगितलं?

Crime News : हैदराबादमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोन ॲपच्या (कर्ज देणारे ॲप) माध्यमातून सुरू असलेल्या सततच्या त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून एका 31 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून डिजिटल कर्ज देणाऱ्या कंपन्यांच्या मनमानी कारभाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हे वाचलं का?

अॅपवरुन कर्ज घेतले अन्...

मिळालेल्या माहितीनुसार, मृत पावलेले मुदावथ श्रीनू हे कोंडापूर बटालियनमध्ये कार्यरत होते आणि पहाडीशरीफ पोलीस ठाण्याच्या हदीतील हर्षगुडा गावात राहत होते. त्यांचा विवाह अवघ्या एक वर्षापूर्वीच झाला होता. चार महिन्यांपूर्वी त्यांनी एका मोबाईल लोन ॲपवरून 40 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते, परंतु ठरलेल्या मुदतीत पैसे परत न केल्यामुळे हा सर्व प्रकार सुरू झाला.

हे ही वाचा : मुंबई : कुर्ल्यात भरदिवसा गोळीबार, 40 वर्षीय व्यक्तीवर धडाधड चालवल्या गोळ्या, नेमकं कारण काय?

मॉर्फ केलेले नग्न फोटो

कर्जाची रक्कम वेळेत फेडता आली नाही म्हणून लोन ॲपच्या ऑपरेटरनी श्रीनू यांना वारंवार फोन करून त्रास देण्यास सुरुवात केली. विशेषतः दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये हा त्रास मोठ्या प्रमाणात वाढवला गेला आणि त्यांना दर तासाला धमक्यांचे फोन येऊ लागले. पैसे न दिल्यास कॉन्स्टेबल आणि त्यांच्या पत्नीचे मॉर्फ केलेले (बदनामीकारक) नग्न फोटो नातेवाईक व ग्रामस्थांमध्ये व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.

हे ही वाचा : नर्सची करवतीने वार करुन हत्या, नवऱ्याच्या क्रूरतेचा कळस, दोन वर्षांपासून मृतदेह गायब

कॉल रेकॉर्डसची तपासणी

या टोकाच्या मानसिक दबावाला आणि धमक्यांना न जुमानता आल्यामुळे अखेरीस श्रीनू यांनी सोमवारी (9 नोव्हेंबर) सकाळी आपल्या राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलले. घटनेची माहिती मिळताच पहाडीशरीफ पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील दोषींची ओळख पटवण्यासाठी आणि कॉल रेकॉर्ड्सची कसून चौकशी करण्यासाठी पोलीस सध्या पुढील तपास करत आहेत.