दुकानात काम करणाऱ्या तरुणीचा चेंजिंग रुममध्ये दुर्दैवी अंत

सुशांत काळे

• 03:20 PM • 15 Nov 2026

Crime News : एका कपड्याच्या दुकानातील चेंजिंग रुममध्ये तरुणीचा मृतदेह आढळून आल्याची घटना आहे. तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच आसपासच्या लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा पुढील तपास करण्यास सुरुवात केली.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

दुकानातील चेंजिंग रुममध्ये तरुणीचा मृतदेह

point

तरुणीच्या मृत्यूचे कारण समोर अद्याप समोर नाही

Crime News : एका कपड्याच्या दुकानातील चेंजिंग रुममध्ये तरुणीचा मृतदेह आढळून आल्याची घटना आहे. तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच आसपासच्या लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा पुढील तपास करण्यास सुरुवात केली होती. ही दुर्दैवी घटना राजधानी दिल्लीतील मोतीनगर परिसरातील आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Astrology : 'या' राशींना होणार धनाचा लाभ, काय सांगतं राशीभविष्य

दुकानातील चेंजिंग रुममध्ये तरुणीचा मृतदेह

घडलेल्या घटनेनुसार हे प्रकरण दिल्लीच्या मोतीनगर 5/8 ब्लॉक परिसरातील आहे. प्राथमिक माहितीनुसार, मृत तरुणी दुकानात काम करत होती. सांगितले जातेय की, त्याच दुकानात एक व्यक्ती देखील काम करत होती. याच दुकानात तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने मोठा प्रश्न उपस्थित राहिला होता. मात्र तरुणीचा मृत्यू नेमका कोणत्या कारणातून झाला? तिच्या मृत्यूचे कारण आणि घटनेच्या वेळी दुकानात घडलेल्या घटना या सर्वांची चौकशी सुरू आहे. 

तरुणीच्या मृत्यूचे कारण समोर अद्याप समोर नाही

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्रकरणाचा पुढील तपास केला. प्राथमिक तपासाच्या माहितीनुसार महिल्येच्या मृत्य़ूचे नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. प्राथमिक तपासातून मृत्यचे मागील कारण समोर आलेले नाही. पोलिसांनी परिसरातील लोकांची चौकशी केली असून दुकानाशी संबंधित परिस्थितीचा तपास करण्यात येत आहे. 

हे ही वाचा : भावाच्या वादात बहिणीनं विचारला जाब, तरुणांनी गोळीबार करत संपवलं

अहवाल आणि पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतर त्या तरुणीचा मृत्यू झाला की अपघात झाला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट समोर आलेले नाही.