Crime news : गाजियाबादच्या लोनी बॉर्डर परिसरात इंदिरापुरी वसाहतीत शनिवारी रात्री सामान्य वाद निर्माण झाला होता. भावाला केलेल्या मारहाणीत बहिणीने मध्यस्ती केली असता, तरुणीवर हल्ला करण्यात आला आणि हत्या केली. तरुणीची ओळख पूजा (वय 35) अशी ओळख समोर आली. ही घटना उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Astrology : 'या' राशींना होणार धनाचा लाभ, काय सांगतं राशीभविष्य
संतप्त कुटुंबीयांनी आरोपीच्या घराची केली तोडफोड
तरुणीला गंभीर परिस्थितीत दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते. या घटनेनं संतप्त कुटुंबीयांनी आरोपीच्या घराची तोडफोड करण्यात आली. गोंधळ आणि तणावात अनेक पोलीस ठाण्यात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. ही घटना इंदिरापुरी वसाहतीच्या डी-ब्लॉकमध्ये घडली होती. तिथेच राहणाऱ्या बाबूलाल यांनी आपली मुलगी पूजाचा विवाह नरेंद्र नावाच्या व्यक्तीशी लावण्यात आला होता. पूजाला दोन मुली असून ती भाऊबीजेसाठी माहेरी आली होती.
बहीण पूजावर गोळीबार
शनिवारी रात्री, पूजाचा भाऊ अमन, त्यांच्या घरापासून सुमारे 50 मीटर अंतरावर बसला होता. दुसऱ्या गल्लीत राहणाऱ्या काही तरुणांशी वाद झाला होता. त्यांनी अमनवर हल्ला केला आणि पिस्तुलाच्या सहाय्याने जखमी केले. भवावर करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे ती आरोपीच्या घरी गेली होती. तिथे दोन्ही गटात चांगला वाद झाला. याच घटनेदरम्यान, पूजाला गोळी लागली होती. गोळी तिच्याच डोक्यात लागल्याने ती गंभीर जखमी झाली होती.
हे ही वाचा : एक इंजेक्शन अन् 17 वर्षीय प्राचीचा मृत्यू, संतापलेल्या लोकांनी मेडिकलला लावली आग; नेमकं प्रकरण काय?
डॉक्टरांनी पूजाला केलं मृत घोषित
तिच्या कुटुंबीयांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. पूजाच्या मृत्यूची बातमी मिळताच कुटुंब पूर्णपणे खचून गेलं. संतप्त झालेल्या कुटुंबीय आरोपीच्या घरी पोहोचले आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली. यामुळे वस्तीत तणावाचे वातावरण निर्माण झाले. डीसीपी ग्रामीण सुरेंद्रनाथ तिवारी यांच्या माहितीनुसार, गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. गोळी लागलेल्या पूजेला जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
ADVERTISEMENT












