एक इंजेक्शन अन् 17 वर्षीय प्राचीचा मृत्यू, संतापलेल्या लोकांनी मेडिकलला लावली आग; नेमकं प्रकरण काय?

पृथ्वीराज पाटील

• 12:33 PM • 15 Nov 2026

राजस्थानमधील भिलवाडा येथे तापाने त्रस्त असलेल्या 17 वर्षीय प्राचीचा, एका मेडिकल स्टोअरमध्ये इंजेक्शन घेतल्यामुळे मृत्यू झाला. तिच्या कुटुंबीयांनी स्टोअर मालकावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

इंजेक्शन घेतलं अन् झाला मृत्यू

point

17 वर्षीय प्राचीसोबत काय घडलं?

point

सरकारी दवाखान्याची अवस्था काय?

Crime News : एका मेडिकल स्टोअरवर बोगस डॉक्टरने इन्जेक्शन दिल्याने 17 वर्षीय प्राची मेहता या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तापाचा त्रास होत असल्यामुळे कुटुंबीय प्राचीला औषध आणण्यासाठी स्थानिक 'लवकुश मेडिकल स्टोअर' येथे घेऊन गेले होते. आरोप आहे की, दुकानचालक रामप्रसाद याने तिला गोळ्या देण्याऐवजी स्वतःच एक इन्जेक्शन दिले, ज्यामुळे तिच्या प्रकृतीत बिघाड होत गेला आणि अखेर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. राजस्थानमधील भिलवाडा येथील सुभाष नगर येथील ही घटना आहे.

हे वाचलं का?

नातेवाईक अन् नागरिकांचे विरोध प्रदर्शन

इन्जेक्शन दिल्यानंतर काही वेळातच प्राचीच्या पायात तीव्र वेदना सुरू झाल्या आणि तेथे रक्ताची गाठ तयार झाली. प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांनी तिला सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात आणि नंतर उदयपूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले, जिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी मेडिकल स्टोअरच्या बाहेर जोरदार विरोध प्रदर्शन केले. काहींनी दुकानाचे शटर तोडण्याचा आणि आग लावण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.

हे ही वाचा : किरीट सोमय्यांनी आरोप केलेल्या इमारतीत किती बांगलादेशी आढळले? पाहाच

मेडिकलमध्येच रुग्णांना इंजेक्शन्स

याप्रकरणी मृताच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिक नागरिकांनी दोषी दुकानचालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. मृत प्राचीच्या आजीने दिलेल्या माहितीनुसार, दुकानावर जाऊन साधी गोळी घेण्याऐवजी तिला चुकीचे इन्जेक्शन दिले, ज्यामुळे तिचा जीव गेला. तसेच, नगर निगमच्या स्थानिक नगरसेवकांनी आरोप केला आहे की, याच मेडिकल स्टोअरमधून यापूर्वीही रुग्णांना विनाकारण इन्जेक्शन देण्याच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. वाढत्या रोषाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मेडिकल स्टोअर सील केले असून, मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

हे ही वाचा : चेंजिंग रुममध्ये 18 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ, कपड्यांच्या शोरुममध्ये काय घडलं?

सरकारी दवाखान्याची अवस्था काय?

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुभाष नगर पोलिसांनी फरार आरोपी संचालक रामप्रसाद याचा शोध सुरू केला असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी परिसरातील आरोग्य सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, स्थानिक सरकारी दवाखान्यात कायमस्वरूपी डॉक्टर नियुक्त करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळता येईल.