जबरदस्ती दारू पाजली, साडी नेसवून 20 वर्षीय तरुणावर अत्याचार; 19 जणावर गुन्हा

सुशांत काळे

• 05:47 PM • 14 Nov 2026

Crime News : कारागृहात 20 वर्षीय तरुणावर तीन वेळा लैंगिक अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना आहे. लैंगिक अत्याचार करून पीडिताला दारू पिण्यास आणि साडी नेसण्यास जबरदस्ती केल्याचा आरोप आहे. पीडिताच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे, 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

20 वर्षीय तरुणावर कारागृहाच तीन वेळा लैंगिक अत्याचार

point

तरुणाला तुरुंगात गुंगीचे औषध दिले

Crime News : एका कारागृहात 20 वर्षीय तरुणावर तीन वेळा लैंगिक अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना आहे. लैंगिक अत्याचार करून पीडिताला दारू पिण्यास आणि साडी नेसण्यास जबरदस्ती केल्याचा आरोप आहे. पीडिताच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे, खेळगाव पोलीस ठाण्यात कारागृह अधीक्षक, कारागृह रुग्णायाचे वैद्यकीय अधिकारी आणि वॉर्ड प्रभारी यांच्यासह 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही दुर्दैवी घटना झारखंडच्या रांची येथील होटवार कारागृहातील आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 9 वीतील मुलाचा आईवर चाकू हल्ला, स्वत: इमारतीवरून पडून दुर्दैवी मृत्यू

तरुणाला तुरुंगात गुंगीचे औषध दिले

घटनेनुसार, एका तरुणाला तुरुंगात गुंगीचे औषध देण्यात आले होते, नंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. जेव्हा तक्रार केली असता, त्याचे पत्र फाडून टाकण्यात आले आणि वैद्यकीय उपचारास नाकारले गेले होते. तुरुंगातून सुटल्यानंतर पीडिकेनं आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत कुटुंबाला सांगितले होते, त्यानंतर तिच्या वडिलांनी एफआरआय दाखल केला.

तरुणाने कुटुंबीयांना दिली माहिती

मेकॉन कॉलनीत एका तरुणाच्या खटल्यात विचाराधीन म्हणून बसलेला बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहात कैद करण्यात आला होता. रांची न्यायालयाने 12 जून 2026 रोजी त्याची निर्दोषपणे मुक्तता झाली होती. सुटका झाल्यानंतर तो तरुण तीव्र मानसिक त्रासातून जात होता. त्याने तुरुंगात घडलेल्या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली होती. ज्यामुळे वडिलांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली. 

हे ही वाचा : गेवराई तालुक्यात भीषण दुर्घटना, मोटारसायकल अपघातात हवाई दलातील जवानाचा मृत्यू

एफआरआयनुसार, तुरुंगातील काही कैद्यांनी महाशिवरात्री, रामनवमी आणि सरहुलच्या रात्री तरुणावर तीन वेळा सामूहिक अत्याचार केला होता. महाशिवरात्री दिवशी आरोपीने साडू नेसायला सांगून त्यावर अत्याचार केला, तसेच तरुणाला मादक द्रव देखील देण्यात आले होते. त्यानंतर त्याला ओढत वॉर्ड क्रमांक 3-A येथे ओढत नेण्यात आले होते, जिथे त्याच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. या घटनेनंतर संबंधित तरुणाला मोठा रक्तस्त्राव झाला होता.