Crime News : गुजरातच्या पंचमहल जिल्ह्यात शेहरा तालुक्यात प्रेमसंबंधाच्या संशयातून एका 20 वर्षीय तरुणाने अपहरण करून बेदम मारहाण केली. गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणाला अहमदाबाद येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली. तसेच आरोपीची ओळख अल्पशे पटेल फरार झाल्याची माहिती समोर आली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Astrology : 'या' राशींना होणार आर्थिक लाभ, जाणून घ्या 12 राशींचे भविष्य
मृत व्यक्तीची ओळख महेश राठौड अशी समोर आली. महेशचा भाऊ दिनेश राठौड यांनी शेहरा पोलीस ठाण्यात सात लोकांविरोधात अपहरण आणि हत्येची तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीच्या आधारे महेश कामावर जाण्यासाठी घरातून निघाला होता, तेव्हा शेजारच्या काही लोकांनी त्याला वाटेत अडवले.
मोटारसायकलवरून अपहरण
संबंधित प्रकरणात असा आरोप केला की, आरोपींनी महेशला त्याच्या बहिणीसोबतच्या संवादाबाबत विचारले. त्यानंतर त्याचे मोटारसायकलवरून अपहरण करण्यात आले. आरोपींनी त्याला काठीने निर्दयीपणे मारहाण केली, लाथा मारल्या आणि ठोसे मारले. या हल्ल्यात महेश गंभीर जखमी झाला आणि त्याचे शरीर रक्ताने माखले होते.
सहा आरोपींना अटक
जखमी महेशला 108 रुग्णवाहिकेने रुग्णालयात नेण्यात आले होते. प्रथोमपचारानंतर त्याला गोधरा आणि वडोदरा येथे नेण्यात आले होते. त्याची प्रकृती खालावल्याने त्याला अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयात दाखल केले, जिथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशातच काही तासानंतर सहा आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली.
हे ही वाचा : धाराशिव : 'पप्पा, मला मोबाईल पाहिजे...' 29 वर्षीय मुलाने वडिलांना झोपेतच संपवले
प्राथमिक तपासातून समोर आले की, महेश आरोपीच्या मुलीशी संवाद साधत होता. या गोष्टीमुळे आरोपी अगदीच संतप्त झाला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शत्रुत्वामुळे महेशचे अपहरण झाले आणि त्याच्यावर हल्ला करण्यात आला. मुख्य आरोपी, अल्पेश पटेल अद्याप फरार असून पोलीस कसून चौकशी करत आहेत.
ADVERTISEMENT












