Solapur Crime : सोलापूर जिल्ह्यातील दुधनी (ता. अक्कलकोट) येथे एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून चार जणांनी मोबाईल दुकानात घुसून तरुणावर प्राणघातक हल्ला करत त्याचा खून केला. गुरुवारी (12 नोव्हेंबर) दुपारी घडली. या हल्ल्यात महेश धानप्पा गुड्डोडगी (वय 30, रा. दुधनी) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मयताचा भाऊ शिवकुमार धानप्पा गुड्डोडगी (वय 32) यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
मोबाईल शॉपीत काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी 3 वाजून 57 मिनिटांच्या सुमारास महेश गुड्डोडगी हा दुधनी नगरपालिकेच्या गाळ्यात असलेल्या मोबाईल शॉपीत बसलेला होता. यावेळी आरोपी सचिन बसवराज कौलगी आणि त्याच्यासोबत आलेल्या अन्य तीन अनोळखी तरुणांनी दुकानात प्रवेश केला. पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून या चौघांनी महेशला लाथाबुक्क्यांनी तसेच चप्पलने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
हे ही वाचा : Maharashtra Weather : पुढील काही तास महत्त्वाचे, 'या' जिल्ह्यांत मध्यरात्री गारवा जाणवणार
लोखंडी पाईपमध्ये चाकू अडकवला अन्
मारहाण सुरू असतानाच मुख्य आरोपी सचिन कौलगी याने अचानक चाकू काढला आणि तो लोखंडी पाईपमध्ये अडकवून त्याच पाईपने महेशवर जोरदार प्रहार केले. या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने महेशचा मृत्यू झाला. घटनेनंतर चारही हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
हे ही वाचा : Govt Jobs : भारत सरकारच्या कंपनीत नोकरीची संधी, 1 लाख रुपयांहून अधिक पगार
कर्नाटकात शोधमोहिम सुरु
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथके तयार करून रवाना केली आहेत. हल्ल्यानंतर आरोपी सचिन कौलगी व त्याचे तीन साथीदार महाराष्ट्रातून शेजारील कर्नाटक राज्याच्या दिशेने पसार झाल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या
ADVERTISEMENT












