Crime News : झारखंडमध्ये आईच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने एका व्यक्तीने आपल्या दोन वर्षांच्या भाचीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील नरसंडा गावात ही घटना घडली. पोलिसांनी बेपत्ता झालेल्या अडीच वर्षांच्या मुलीचा मृतदेह गावाजवळील नाल्यातून ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकाला अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. समीर पान असे आरोपीचे नाव आहे. मृत चिमुकलीच्या आईसोबत असलेल्या विवाहबाह्य संबंधातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीला मुलीच्या आईसोबत दुसरीकडे जाऊन राहायचे होते. मात्र, मुलगी त्यांच्या योजनेत अडथळा ठरत असल्याचे त्याला वाटत होते. त्यामुळे त्याने मुलीला संपवण्याचा निर्णय घेतल्याचे तपासात समोर आले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : सोलापूर : लोखंडी पाईपमध्ये चाकू अडकवून तरुणावर सपासप वार, भरदिवसा मोबाईल शॉपीत काय घडलं?
अडीच वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचे वडील ओडिशातील केओंझार जिल्ह्यात राहतात. 11 नोव्हेंबर रोजी त्यांची अडीच वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. मुलगी आणि तिची आई झारखंडमधील नरसंडा गावात समीर पान याच्या घरी आले होते. समीर हा मुलीचा सावत्र काका असल्याची माहिती समोर आली आहे. मफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे गाव येते. मुलगी 11 नोव्हेंबर रोजी समीरसोबत घराबाहेर गेली होती. मात्र, त्यानंतर ती परत आली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला आणि पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा तपास सुरू झाल्यानंतर पोलिसांना समीरच्या हालचालींबाबत संशय आला. त्यानुसार पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली.
हेही वाचा : Maharashtra Weather : पुढील काही तास महत्त्वाचे, 'या' जिल्ह्यांत मध्यरात्री गारवा जाणवणार
आरोपीकडून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीरचे मुलीच्या आईसोबत विवाहबाह्य संबंध होते. मुलीची आई ही त्याची चुलत बहीण आहे. दोघांना दुसरीकडे जाऊन एकत्र राहायचे होते. मात्र, अडीच वर्षांची मुलगी सोबत असल्याने त्यांच्या योजनेत अडथळा निर्माण होत असल्याचे समीरला वाटत होते. त्यामुळे त्याने मुलीला संपवण्याचे ठरवले. 11 नोव्हेंबर रोजी तो मुलीला काहीतरी कारण सांगून गावाजवळील नाल्याकडे घेऊन गेला. तिथे त्याने मुलीला नाल्यात ढकलून दिले. त्यामुळे तिचा मृत्यू झाला, अशी माहिती मफस्सिल पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद कुमार यांनी वृत्तसंस्था पीटीआयला दिली. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला होता. तपासादरम्यान समीरच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
शुक्रवारी पोलिसांनी समीर पान याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आपण मुलीला घरी सोडले होते आणि त्यानंतर बाजारात गेलो होतो, असा दावा त्याने केला. मात्र, पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलीस अधिकारी विनोद कुमार यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी गावाजवळील नाल्यातून मुलीचा मृतदेह शोधून काढला. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर जवळपास तीन दिवसांनी तिचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडीत रवाना केले आहे. आईसोबतच्या विवाहबाह्य संबंधातून आणि मुलगी अडथळा ठरत असल्याच्या कारणातून आरोपीने हे कृत्य केल्याचा प्राथमिक तपासातील निष्कर्ष पोलिसांनी सांगितला आहे.
ADVERTISEMENT












