Kalyan Crime : कल्याण शहरात गुन्हेगारीत सातत्याने वाढ होऊ लागली आहे. शहरातील पूर्व भागात पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनं पीडित पोलिसांच्या कुटुंबीयांनी आरोपींविरोधात संताप व्यक्त करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून अटकेची मागणी केली. या घटनेनं आता समाजाचे रक्षण करणाऱ्या पोलिसांचेच कुटुंब सुरक्षित नसल्याने दिसून आले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बापाने 10 वर्षीय लेकावर तेल ओतून पेटवलं, गंभीररित्या भाजला मुलगा
पोलीस कुटुंबाला आरोपींकडून मारहाण
घडलेल्या घटनेनुसार, कल्याण पूर्व परिसरात काही जणांकडून एका पोलिसांच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत पोलीस कर्मतचाऱ्याच्या कुटुंबीयांनाही देखील लक्ष करण्यात आले होते. गावगुंडांनी मुजोरी करून पोलिसांच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याची घटना आहे. अशातच पीडित कुटुंबीयांनी मनसेकडे धाव घेतली. आरोपींवर कठोर कारवाई करत गंभीर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
कायदा आणि सुव्यवस्थेचा गुंडांना धाक राहिला आहे की नाही?
त्याचप्रमाणे भविष्यात अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होऊ नयेत, तसेच या घटना सातत्याने घडू नयेत, अशी मागणी केली. दरम्यान, पोलिसांच्या कुटुंबीयांना मारहाणीला सामोरे जावे लागल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा गुंडांना धाक राहिला आहे की नाही? असा गंभीर प्रश्न उपस्थित राहत आहे. सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हे ही वाचा : दुकानात काम करणाऱ्या तरुणीची चेंजिंग रुममध्ये हत्या
दरम्यान, कल्याण- डोंबिवली परिसरात गुन्हेगारीत वाढ होऊ लागली आहे. यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेला धाब्यावर बसवले की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ADVERTISEMENT












