Washim News : वाशिम जिल्ह्यांत बांधकाम सुरू असलेल्या विहिरीची संरक्षण भिंत बांधताना पाण्याने भरलेल्या विहिरीत पडून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आहे. ही घटना वाशिमच्या अनसिंग गावातील आहे. हरिभाऊ वाबळे यांच्या शेतात विहिरीचे काम सुरू होते. 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता दोन कामगार विहिरीच्या आत सिमेंटची भिंत बांधण्याचे काम करत होते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Astrology : 'या' राशीला पैशांच्या लाभाचे नवीन मार्ग, जाणून घ्या 12 राशींचे भविष्य
यादरम्यान अचानकपणे एका कामगाराचा तोल गेला, त्याचे डोके सभोवतालच्या भिंतीवर आदळले आणि तो विहिरीत पडला. या घटनेदरम्यान एका व्यक्तीने शेतकऱ्याला घटनेची माहिती दिली होती.
विहिरीत पडलेल्या दोघांचा मृत्यू
त्यानंतर घटनास्थळी गावातील लोक आणि पोलीस पथकाने धाव घेतली होती, मात्र तोवर उशिर झाला होता. अकोला जिल्ह्यातील पिंजर गावातून मानव संसाधन अपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पाणबुड्यांन बोलावण्यात आले होते. त्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, त्यांनी पाण्यात बुडालेल्या संतोष रामदास जामनिग्के आणि वासुदेव श्रीरंग धोंगडे यांना बाहेर काढून रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
हे ही वाचा : डोंबिवली: काळाचा घाला, छठपूजेसाठी गेलेल्या 22 वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू
मजूर पाण्यात पडल्याची माहिती समजताच, अनेक गावातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. आन्सिंग पोलीस अधिकारी संतोष शेळके यांनी आज तक या वृत्तमाध्यमाशी बोलताना सांगितलं की, शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. आन्सिंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT












