Mumbai Local Train Crime : प्रवाशांमधील वादातून 53 वर्षीय व्यक्तीवर चाकूने हल्ला, Video व्हायरल

सुशांत काळे

17 Nov 2026 (अपडेटेड: 17 Nov 2026, 04:56 PM)

Mumbai Local Train Crime : लोकल रेल्वे ही मुंबईची जीवन वाहिनी आहे, असं म्हणतात. या रेल्वेत असंख्य नोकरदार, विद्यार्थी, तरुण प्रवास करतात. मात्र आता याच लोकलमध्ये मारहाणीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होऊ लागली आहे. दोन प्रवाशांमध्ये झालेल्या वादात एकाने चाकू फेकला असता, तो चाकू एका 53 वर्षीय प्रवाशाला लागला. या हल्ल्यात व्यक्ती गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.

Mumbai Local Train Crime

Mumbai Local Train Crime

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

विरार-चर्चगेट फास्ट लोकल रेल्वे स्थानकावर दुर्दैवी घटना 

point

अंधेरी स्थानकावरून रेल्वे जाताना दोन व्यक्तींमध्ये वाद

point

चाकू लागला तिसऱ्याच व्यक्तीला

Mumbai Local Train Crime : लोकल रेल्वे ही मुंबईची जीवन वाहिनी आहे, असं म्हणतात. या रेल्वेत असंख्य नोकरदार, विद्यार्थी, तरुण प्रवास करतात. मात्र आता याच लोकलमध्ये मारहाणीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होऊ लागली आहे. दोन प्रवाशांमध्ये झालेल्या वादात एकाने चाकू फेकला असता, तो चाकू एका 53 वर्षीय प्रवाशाला लागला. या हल्ल्यात व्यक्ती गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : नागपूर: ट्युशन क्लासमध्ये महिलेनं विद्यार्थ्यांना पाठवले अश्लील फोटो, व्हिडिओ

विरार-चर्चगेट फास्ट लोकल रेल्वे स्थानकावर दुर्दैवी घटना 

अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी नंतर चाकू जप्त करून आरोपीला अटक केली. आरोपीची नाशिकचा रहिवासी शिवा गायकवाड (25) अशी ओळख पटली. त्यांनी सांगितले की, आरोपीला नंतर वांद्रे येथील शासकीय रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) ताब्यात देण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना रविवारी विरार-चर्चगेट फास्ट लोकल रेल्वे स्थानकावर घडली होती.

अंधेरी स्थानकावरून रेल्वे जाताना दोन व्यक्तींमध्ये वाद

या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. त्या व्यक्तीची ओळख सुरेश शर्मा अशी समोर आली. तसेच पोलिसांनी सांगितलं की, अंधेरी स्थानकावरून रेल्वे जाताना दोन व्यक्तींमध्ये वाद झाला. त्यापैकी एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर चाकू फेकला होता. तोच चाकू संबंधित व्यक्तीला न लागता तिसऱ्याच व्यक्तीला लागला. 

हे ही वाचा : वाशिम: विहिरीचे बांधकाम सुरू असताना दोन कामगारांचा बुडून मृत्यू

पोलिसांच्या तपासानुसार, प्रवाशांनी अपत्कालीन चैन ओढून रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न केला, पुढे रेल्वे बांद्रा स्थानकावर थांबली. जखमी झालेली व्यक्ती शर्मा यांना तात्काळ बांद्रा स्थानकावरील कार्यालयात नेण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना भाभा रुग्णालयात नेण्यात आले होते. दरम्यान संबंधित व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे.