नागपूर: ट्युशन क्लासमध्ये महिलेनं विद्यार्थ्यांना पाठवले अश्लील फोटो, व्हिडिओ

योगेश पांडे

• 03:46 PM • 17 Nov 2026

Nagpur Crime : नागपुरात एका नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये काम करणाऱ्या तरुणीने विद्यार्थ्यांना वॉट्सअॅपवर स्वत:चे अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना नागपुरातील कामठीतील एका ट्युशन क्लासमधील आहे.

Nagpur Crime

Nagpur Crime

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये काम करणाऱ्या तरुणीने विद्यार्थ्यांना वॉट्सअॅपवर पाठवले अश्लील फोटो

point

पुरावे गोळा करून पोलीस ठाण्यात तक्रार 

Nagpur Crime : नागपुरात एका नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये काम करणाऱ्या तरुणीने विद्यार्थ्यांना वॉट्सअॅपवर स्वत:चे अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना नागपुरातील कामठीतील एका ट्युशन क्लासमधील आहे. या प्रकरणात महिलेविरुद्ध पोक्सो कायदा आणि IT AC अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : वाशिम: विहिरीचे बांधकाम सुरू असताना दोन कामगारांचा बुडून मृत्यू

कोचिंग क्लासमधील महिलेचे विद्यार्थ्यांच्या फोनमध्ये अश्लील व्हिडिओ

कोचिंग क्लासमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये कोचिंग क्लासमध्ये काम करणाऱ्या तरुणीचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो आढळले. या घटनेची माहिती नंतर विद्यार्थ्यांच्या पालकांना समजली होती. महिलेनेच संबंधित फोटो आणि व्हिडिओ पाठवल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे. महिलेनं असं कृत्य का केलं असाव? असा प्रश्न उपस्थित होत आहे.  

पुरावे गोळा करून पोलीस ठाण्यात तक्रार 

जिल्हा बाल संरक्षण अधिकारी असलेले मुश्ताक पठाण यांच्याकडे याबाबत बाल संरक्षण पथकाने तातडीने दखल घेतली. चाईल्ड हेल्पलाईनच्या पूजा कांबळे आणि मिनाक्षी धडाडे यांनी प्राथमिक चौकशी केली असता, पुरावे गोळा केले आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 

हे ही वाचा : डोंबिवली: काळाचा घाला, छठपूजेसाठी गेलेल्या 22 वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

नागपुरातील जुनी कामठी पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास करणार असल्याचे सांगितलं. या प्रकारामुळे आणखी किती अल्पवयीन विद्यार्थी प्रभावित झाले असावे, याचा पुढील तपास करण्यात आला. या घटनेनं शौक्षणिक संस्थांमधील बालसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.