Pandharpur Crime News : भक्तीची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर शहरात गोळीबाराची घटना घडली असून, शिवा संघटनेचे अध्यक्ष राजा भिंगे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पंढरपूर शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील इसबावी परिसरातील नवशक्ती चौकाजवळ असलेल्या उभा नगर भागात ही घटना घडली. राजा भिंगे हे रात्री जेवण झाल्यानंतर आपल्या मुलासोबत घराजवळ फिरण्यासाठी बाहेर आले होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक गोळीबार केला. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. हल्लेखोरांनी राजा भिंगे यांच्यावर तीन राऊंड फायर केल्या. भरवस्तीत आणि घराजवळच हा गोळीबार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Personal Finance: एकदाच पैसे खर्च करा, दरवर्षी हजारोंची बचत करा! मध्यमवर्गीयांसाठी खास गुंतवणूक
अज्ञात हल्लेखोरांकडून अचानक बेछूट गोळीबार
या हल्ल्यात राजा भिंगे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. गोळीबार झाल्यानंतर त्यांच्या मुलाने तातडीने त्यांना पंढरपूर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी अचानक बेछूट गोळीबार केल्याने राजा भिंगे यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. या घटनेनंतर इसबावी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वर्दळीच्या ठिकाणी आणि भरवस्तीत झालेल्या या गोळीबारामुळे पंढरपूर शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा ; अजित पवार विमान अपघात प्रकरण : शेवटचे 3 तास, सीसीटीव्ही आणि RTI ची माहिती
राजा भिंगे यांची पोलिसांच्या रेकॉर्डवर सराईत गुन्हेगार म्हणून नोंद
दरम्यान, मृत राजा भिंगे यांची पोलिसांच्या रेकॉर्डवर सराईत गुन्हेगार म्हणून नोंद होती. त्यांच्यावर खुनासह इतर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या हत्येमागे नेमके कोणते कारण आहे? हल्लेखोर कोण होते आणि त्यांनी राजा भिंगे यांच्यावर गोळीबार का केला? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी तीन राऊंड फायर केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्यामुळे उभा नगर आणि इसबावी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी घराजवळच घडलेल्या या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे. अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्याचे आणि या हत्येमागील कारण समजून घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पंढरपूरसारख्या वारकऱ्यांच्या पवित्र नगरीत भरवस्तीत गोळीबार करून हत्या झाल्याने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वर्दळीच्या चौकाजवळच दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी तीन राऊंड गोळ्या झाडल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून राजा भिंगे यांच्या हत्येमागील कारण आणि हल्लेखोरांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.
ADVERTISEMENT












