मुंबई : लोकल ट्रेन सुरु झाली अन् नाशिकच्या तरुणाने फेकून मारला चाकू, पुढं काय घडलं?
मुंबईत लोकल ट्रेनमध्ये एका प्रवाशाने चाकू हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 53 वर्षीय व्यक्ती जखमी झाला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तरुणाने फेकून मारला चाकू
53 वर्षीय व्यक्ती जखमी
Mumbai Local Train Attack : मुंबईतील लोकलमध्ये विविध कारणांवरुन होणारे वाद वाढत चालल्याचं पहायला मिळत आहे. रविवारी (15 नोव्हेंबर) विरार-चर्चगेट फास्ट लोकल ट्रेनमध्ये दोन प्रवाशांमध्ये अचानक जोरदार वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले आणि प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. अशा वाढत्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या घटनेनंतर 25 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ट्रेन सुटताना मारला चाकू
मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी रेल्वे स्थानकावरून ट्रेन सुटत असताना वादादरम्यान एका आरोपीने दुसऱ्या व्यक्तीवर चाकू फेकला. मात्र, ज्या व्यक्तीवर तो चाकू फेकला त्याला न लागता, वादाशी काहीही संबंध नसलेल्या दुसऱ्याच व्यक्तीला जाऊन लागला. सुरेश शर्मा असं त्या व्यक्तीचं नाव असून ते 53 वर्षांचे आहेत. शर्मा हे सायन येथील रहिवासी असून यामध्ये ते जखमी झाले आहेत.
हे ही वाचा : रोहित पवारांचे थेट फडणवीसांवर आरोप.., सुप्रिया सुळे प्रतिक्रिया देताना काय म्हणाल्या?
प्रवााशांनी काय केलं?
या घटनेनंतर घाबरलेल्या प्रवाशांनी तातडीने आपत्कालीन साखळी (चेन) ओढून ट्रेन थांबवली, जी पुढे वांद्रे स्थानकावर थांबली. त्यानंतर शर्मा यांना तातडीने वांद्रे स्टेशन मास्टरच्या कार्यालयात नेऊन प्राथमिक उपचार देण्यात आले आणि नंतर पुढील उपचारांसाठी भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा : पंढरपूर हादरले, शिवा संघटनेच्या अध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या, वर्दळीच्या ठिकाणी बेछूट गोळीबार
आरोपी कोण?
या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीकडून चाकू जप्त केला आणि नाशिक येथील निवासी असलेल्या शिवा गायकवाड (25) या आरोपीला अटक केली. त्यानंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी वांद्रे येथील रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) ताब्यात देण्यात आले.
