नवी मुंबई : कर्ज घेतलं, पण हप्ते थकवले; संतापलेल्या जामीनदाराने 23 वर्षीय तरुणासोबत केलं नको तेच!

पृथ्वीराज पाटील

• 03:35 PM • 18 Nov 2026

एका 23 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना नवी मुंबईत घडली. मोबाईलच्या कर्जाचे हप्ते फेडण्यावरुन झालेल्या वादातून हा प्रकार घडला.

Navi Mumbai Crime

Navi Mumbai Crime

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

कर्जाचे हप्ते थकवल्याने संतापला जामीनदार

point

23 वर्षीय तरुणासोबत घडलं भयंकर

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत मोबाईल फोनच्या हप्त्यांवरून झालेल्या वादातून एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. एका 30 वर्षीय व्यक्तीने त्याच्या ओळखीच्या असणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणाची हत्या केली. प्रतीक मोहन जाधव असे आरोपीचे नाव असून, तो पनवेलचा रहिवासी आहे. प्रतीक दिलीप अंबावाले (23, रा. कोपरी, ठाणे) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

जामीनदाराला रिकव्हरी एजंट्सचा जाच

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अंबावले याने कर्ज काढून दोन मोबाईल फोन घेतले होते आणि आरोपी जाधव हा या कर्जासाठी जामीनदार (गॅरेंटर) होता. अंबावलेने कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे रिकव्हरी एजंट्सचा जाच जाधव याला सहन करावा लागत होता. याच कारणावरून 8 नोव्हेंबर रोजी रात्री 1 वाजता पनवेल रेल्वे स्टेशन येथे दोघांची भेट झाली आणि ते शिवकर गावाकडे गेले. तिथे त्यांच्यात पुन्हा वाद झाला.

हे ही वाचा : बीड : 'तो' संशय अन् दोन मित्रांना ट्रॅक्टरला बांधून अमानुष मारहाण, एकाचा मृत्यू

हत्या करुन मृतदेह झुडपात लपवला

वाद विकोपाला गेल्यावर अंबावलेने जाधव याला लाथ मारली, ज्यामुळे संतापलेल्या जाधवने जवळील चाकूने त्याच्यावर वार करून त्याची हत्या केली. हत्येनंतर आरोपीने मृतदेह जवळील झुडपात लपवला, रक्ताने माखलेले हत्यार मृतकाच्या काळ्या बॅगेत ठेवून ती बॅग शिवकर-ओएनजीसी रोडवरील पुलाखाली फेकून दिली आणि तिथून पळ काढला.

हे ही वाचा : धावत्या वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये एकच खळबळ अन्...

22 कॉल्स अन् हत्येचा उलगडा

अंबावले 9 नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याने कोपरी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि तपासादरम्यान शेवटचे लोकेशन पनवेलमधील उसरली गावाजवळ असल्याचे व जाधवचे 22 कॉल आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी चौकशी केल्यास जाधवने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी शिवकर येथील एका शाळेमागील झुडपातून मृतदेह जप्त केला असून, पनवेल शहर पोलिसांनी हत्येचा व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.