एआयच्या मदतीने महिलेचे बनवले अश्लील फोटो अन्..

सुशांत काळे

• 07:00 AM • 19 Nov 2026

Crime News : एका महिलेचे एआयच्या मदतीने अश्लील फोटो बनवून व्हायरल करण्यात आले. महिलेच्या नवऱ्याने आपल्या भाचा आणि तिच्या पत्नीसह तीन जणांवर आरोप करत तक्रार दाखल केली.

पत्नीचे अश्लील फोटो केले व्हायरल अन्...

पत्नीचे अश्लील फोटो केले व्हायरल अन्...

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

एआयच्या मदतीने पत्नीचा बनवला एआय फोटो

point

सायबर क्राईमबाबतच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न

Crime News : झारखंडच्या ज्वालापुरी कोतवाली पसिरातील राहणार्‍या एका महिलेचे एआयच्या मदतीने अश्लील फोटो बनवून व्हायरल करण्यात आले. महिलेच्या नवऱ्याने आपल्या भाचा आणि तिच्या पत्नीसह तीन जणांवर आरोप करत तक्रार दाखल केली. या घटनेनं सायबर क्राईमबाबतच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित राहत आहेत. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : जबरदस्ती दारू पाजली, साडी नेसवून 20 वर्षीय तरुणावर अत्याचार; 19 जणावर गुन्हा

पोलिसांच्या माहितीनुसार, एका व्यक्तीने पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार सांगितलं की, त्याची बहीण, भाचा आणि पत्नीसह तिघांवर आरोप करत एफआयआर दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, त्याची बहीण, भाचा आणि पत्नीचा त्याच्याच पत्नीवर राग आहे. 

एआयच्या मदतीने पत्नीचा बनवला एआय फोटो

संबंधित प्रकरणात असा आरोप करण्यात आला की, या रागातून 2 नोव्हेंबर रोजी आरोपींनी एआयच्या मदतीने पत्नीचा फोटो आक्षेपार्ह स्वरुपात बनवला. त्यानंतर तो फोटो सोशल मीडियाद्वारे नातेवाईकांना पाठवला आणि नंतर इंटरनेटवर व्हायरल करण्यात आला. 

हे ही वाचा : 9 वीतील मुलाचा आईवर चाकू हल्ला, स्वत: इमारतीवरून पडून दुर्दैवी मृत्यू

या घटनेत असा आरोप केला की, घटनेची माहिती मिळताच त्यांनी आपल्या बहि‍णींशी संवाद साधला असता, त्यांनी सांगितलं की, तो फोटो सुनेचे असून एआयच्या मदतीने बनवण्यात आलेत. त्यांच्याकडे या संभाषणाचे रेकॉर्डिंग असल्याचा दावा केला. ज्वालापूरचे सीओ संजय चौहान यांनी सांगितलं की, या प्रकरणी एफआरआय दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास करण्यात आला. दरम्यान, एआयचा चुकीच्या पद्धतीने सऱ्हास वापर होताना दिसत आहे. अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे.