बुलढाण्यात खळबळ! प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, पत्नीनं रचला भयंकर कट

जका खान

18 Nov 2026 (अपडेटेड: 18 Nov 2026, 06:31 PM)

बुलढाण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली आहे.

Buldhana Crime

Buldhana Crime

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पत्नीने काढला पतीचा काटा

point

प्रियकरासोबत मिळून रचला भयंकर कट

Buldhana Crime : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक प्रेमसंबंधात पती अडसर ठरत असल्याने पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चिखली तालुक्यातील महीमळ शिवारात ही घटना घडली. गोपाल उर्फ संजय पवार (रा. टाकरखेड हेलगा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी अमडापूर पोलिसांनी मृताची पत्नी कोमल पवार आणि तिचा प्रियकर अजय उर्फ गोट्या पवार (दोघेही रा. वर्दडा) यांना अटक केली आहे.

हे वाचलं का?

प्रेमसंबंधात पतीचा अडसर

मिळालेल्या माहितीनुसार, कोमल पवार आणि अजय उर्फ गोट्या पवार यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, या संबंधात पती गोपाल अडसर ठरत असल्याने दोघांनी त्याला संपवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. घटनेच्या दिवशी गोपाल आणि त्याची पत्नी कोमल हे मेव्हणीच्या घरी जाण्यासाठी बाहेर पडले होते. याचदरम्यान दोघांनी कट रचून गोपाल याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.

हे ही वाचा : मुंबईची खबर : पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय, लवकरच येणार प्रीपेड टॅक्सी

हत्या केली अन् नातेवाईकांना फोन

आरोपींनी गोपालच्या छातीवर आणि गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने गोपालचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, पतीची हत्या केल्यानंतर कोमलने मृताच्या नातेवाईकांना फोन करून आपण आणि अजयने मिळून गोपालला संपवल्याची माहिती दिल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा : धावत्या वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये एकच खळबळ अन्...

प्रियकर अन् पत्नीला अटक

या घटनेची माहिती मिळताच अमडापूर पोलिसांनी प्रकरणाची दखल घेतली. याप्रकरणी कोमल पवार आणि अजय उर्फ गोट्या पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अमडापूर पोलीस करत आहेत.