सॉफ्टवेअर इंजिनिअरने पत्नीचे तब्बल 72 तुकडे केले, अंगाचा थरकाप उडवून टाकणारी मर्डर मिस्ट्री

crime news : अनुपमा गुलाटी या महिलेची पती राजेश गुलाटीने बेदम मारहाण करत हत्या केली. तिचे तब्बल 72 तुकडे करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर तिला जन्मठेप देखील देण्यात आल्याचे वृत्त समोर आले.

crime news

crime news

मुंबई तक

• 02:00 PM • 20 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

अनुपमा गुलाटी हत्याकांडानं देश हादरला

point

पतीने केले तब्बल 72 तुकडे

point

देहारादून न्यायालयाकडून आरोपी पतीला जन्मठेप 

Crime News : देहारादून येथील सध्या अनुपमा गुलाटी हत्याकांड हे चर्चेत असलेले हत्याकांड आहे. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालायने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा ही उत्तराखंड न्यायालयाने कामय ठेवली आहे. या भयानक हत्याकांडात कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाला आव्हान दिले होते. राजेश गुलाटी यांच्यावर 17 ऑक्टोबर 2010 रोजी त्यांची पत्नी अनुपमा गुलाटी यांची निर्घृण हत्या करून, तिच्या शरीराचे 72 तुकडे करून फ्रीजरमध्ये ठेवल्याचा आरोप होता. हे प्रकरण 12 डिसेंबर 2010 रोजी उघडकीस आल्याचे सांगण्यात येत आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'या' राशीतील लोकांच्या प्रेम जीवनात रोमँटिक क्षण येतील, तर काही राशींवर संकटांची टांगती तलवार राहील

नेमकं काय घडलं होतं? 

सप्टेंबर 2017 मध्ये, देहारादून न्यायालयाने राजेश गुलाटी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. नंतर 1.5 दशलक्ष रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. न्यायालयाने 70 हजार रुपये सरकारी तिजोरीत जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते, तसेच उर्वरित रक्कम अनुपमाची मुले पौढ होईपर्यंत बँकेत ठेवावी असे आदेश देखील देण्यात आले.

अनुपमा गुलाटीच्या हत्येचे प्रकरण 12 डिसेंबर 2010 रोजी उघडकीस आले होते, जेव्हा अनुपमाचा भाऊ दिल्लीतून देहारादूनला परतला होता. त्यानंतर एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने आपल्या पत्नीची हत्या केल्याचं वृत्त सांगण्यात येत आहे. तिच्या शरीराचे एक दोन नाहीतर तब्बल 72 तुकडे करण्यात आले होते. तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी ते तुकडे शहराच्या विविध ठिकाणी फेकून देण्यात आले होते. हा संबंधित खटला 2010 रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे.

2010 मध्येच पती राजेशकडून पत्नी अनुपमाला मारहाण

ऑक्टोबर 2010 मध्येच रात्री वादादरम्यान, अनुपमाचा पती राजेशने अनुपमाला मारहाण केली होती. नंतर तिचे डोकं भिंतीवर आदळण्यात आलं होतं आणि ती बेशुद्ध पडली होती. नंतर पुन्हा ती शुद्धीवर येईल आणि नंतर तक्रार देखील करेल याच भीतीने राजेशने तिची निर्घृणपणे हत्या देखील केली होती. तिच्या शरीराचे तुकडे-तुकडे करून पुन्हा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवण्यात आले आणि फ्रीजमध्ये लपवण्यात आले. नंतर ते तुकडे देहारादूनच्या एका निर्जनस्थळावरील भागात विल्हेवाट करून टाकण्यात आले होते.

देहारादून न्यायालयाकडून आरोपी पतीला जन्मठेप 

2017 मध्ये, देहारादून न्यायालयाने राजेशला दोषी देखील ठरवण्यात आले होते आणि नंतर जन्मठेपेची शिक्षा ठेवण्यात आली. तसेच 1.5 दशलक्ष रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. नंतर राजेश गुलाटी यांनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देखील देण्यात आले होते. नंतर न्यायालयाच्या खंडपीठाने आपील फेटाळून लावले आणि कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. 

पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या पती राजेश गुलाटी आणि अनुपमा यांची 1992 मध्ये एका मित्राकडून ओळख निर्माण झाली होती. नंतर सात वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर त्यांनी 10 फेब्रुवारी 1992 मध्ये एक परस्पर मित्रामार्फत ओळख निर्माण झाली. नंतर त्यांनी विवाह देखील केला होता. नंतर ते अमेरिकेत गेले होते, पण काही कारणास्तव त्यांच्याच कुठेतरी दुरावा निर्माण झाला होता, नंतर पत्नी अनुपमा ही काही वर्षांतर भारतात परतली होती. पुन्हा राजेशने तिला अमेरिकेत जाण्यास सांगितलं. सर्वकाही चांगलं सुरळीत सुरु होतं, तिनं जुळ्या मुलांना जन्म दिला होता.

पत्नीच्या मृतदेहाचे तब्बल 72 तुकडे

नंतर ते भारतात आले आणि डेहराडूनमध्ये स्थायिक झाले होते. त्यांचा वाद सुरुच होता. घरगुती हिंसाचार आणि संरक्षण अधिकाऱ्यांपर्यंत हा वाद पोहोचला होता. अनुपमाला महिला 20 हजार रुपये आदेश देण्यात आला होता. राजेशने एका महिन्यासाठी पैसे दिले होते, परंतु 17 ऑक्टोबर 2010 मध्ये त्यांच्यात वाद झाला. राजेशने अनुपमाची निर्घृणपणे हत्या देखील करण्यात आली होती. नंतर त्याने बाजारातून एका धारदार शास्त्राच्या आधारे आणि एका डीप फ्रीजर विकत घेतला आणि मृतदेहाचे तब्बल 72 तुकडे करण्यात आले.

मुलांनी आपल्या वडिलांना आईबाबत विचारले असता, राजेशने सांगितलं की, ती तिच्या आजीच्या घरी गेली आहे. मुलांना माहिती होते की, त्यांची आई डीप फ्रीजमध्ये आहे, तरीही राजेशने मुलांना फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने शरीराचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देण्यात आले. याच प्रकरणाचा तपास करण्यासाठी अनुपमाच्या एका भावाने आपल्या मित्राला पासपोर्ट अधिकारी असल्याचे सांगत घरी पाठवले होते. तेव्हा तिच्या पतीने अनुपमा ही दिल्लीत असल्याचे सांगितले होते.

हे ही वाचा : अमरावती: भररस्तात 19 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून निर्घृण हत्या! घटनेनंतर, संतप्त टोळक्याची परिसरात दहशत...

या घटनेत नंतर पुढे राजेशवर दबाव वाढत गेला. त्यानंतर लक्षात आले की, त्याचे रहस्य उघड होणार आहे, असा विचार करून तो परदेशात पळून गेला. परंतु नंतर 12 डिसेंबर रोजी अनुपमचा भाऊ हा पोलिसांसह आला होता. नंतर पोलिसांनी राजेशला अटक केल्याचे वृत्त चौकशीतून समोर आले आणि घटनेची माहिती उघड झाली.

    follow whatsapp