Crime News : उत्तर प्रदेशातील जैनपूरात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. तरुणानेच आपल्या आईच्या डोक्यात वरवंट्याने हल्ला केला आणि वडिलांनाही ठार मारलं. नंतर आई वडिलांच्या मृतदेहाचे धारधार शस्त्राने तीन तुकडे करण्यात आल्याची माहिती समोर आली. जौनपूरातील जाफराबाद पोलीस स्टेशन परिसरातील अहमदपूर गावात घडली आहे. या प्रकरणातील आरोपींची नावे समोर आली आहेत. आरोपी मुलाचे नाव अंबेश कुमार (वय 37), आईचं नाव बबिता कुमार (वय 60) आणि वडील श्यामलाल (वय 62) अशी नावे समोर आली आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मोठी बातमी: माणिकराव कोकटेंचा 'गेम ओव्हर', मुख्यमंत्री नाही तर 'या' नेत्याकडे दिला राजीनामा; कोणत्याही क्षणी होणार अटक
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसपी सिटी आयुष श्रीवास्तव यांनी याबाबत सांगितलं की, आरोपी अंबेश कुमारने आधी त्याची आई बबिता आणि नंतर त्याचे वडील श्यामलाल यांच्यावर हल्ला केला होता. श्यामलालच्या मृतदेहाचे तीन तुकडे करण्यात आले, नंतर वडिलांचे, आरोपीच्या माहितीवरून, पोलिसांनी घरातून मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरण्यात आलेलं धारदार शस्त्र, तसेच वरवंट्याने डोकं ठेचण्यात आलं होतं, तो वरवंटा पोलिसांनी जप्त केला.
वडिलांशी पैशांवरून वाद
या प्रकरणात आरोपीने सांगितलं की, त्याने स्वयंपाकघरातून वरवंटा आणि घराच्या तळघरात सुरु असलेल्या कामाच्या ठिकाणाहून धारधार शस्त्र आणून ठेवण्यात आले होते. या प्रकरणात आता पोलिसांनी 8 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास त्याच्या वडिलांशी पैशांवरून वाद झाला होता. यामुळे तो खूप संतापला होता. त्याने त्याच्या घरातून धारदार शस्त्र आणलं आणि नंतर वडिलांच्या मृतदेहाचे तीन तुकडे केले. एक भाग डोक्यापासून छातीपर्यंत, तर दुसरा भाग हा छातीपासून गुडघ्यापर्यंत आणि तिसरा भाग हा पायापर्यंत तोडला होता.
आरोपीने आई वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे पोत्यात भरले अन्...
संबंधित प्रकरणात आरोपीने मृतदेहाचे तुकडे पोत्यांमध्ये भरले आणि ते गाडीच्या डिक्कीत ठेवले होते. संबंधित प्रकरणाचा पुरवा नष्ट करण्यासाठी त्याने घरातील रक्ताचे डाग पुसले होते. तसेच मृतदेहाने भरलेले पोतं एका नदीत फेकण्यात आले होते, जिथे आई पाय पाण्यात तरंगताना आढळून आले होते. या प्रकरणात पोलिसांना माहिती दिली की, आरोपीने लॉकडाऊन सुरु असताना कोलकाता येथील सहजिया नावाच्या एका महिलेशी विवाह केला होता. ती आता कोलकाता येथे ब्युटी पार्लरचा छोटासा व्यवसाय करते.
हे ही वाचा : 'ते' वचन देऊन ठेवले लैंगिक संबंध, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर मोठी खळबळ
अंबेश हा पत्नीला घटस्फोट देण्यासाठी पैशांची मागणी करत होता. परंतु, तिच्या वडिलांनी पैसे देण्यास दिला होता. दोघांमध्ये नेहमीच वाद देखील व्हायचा. तसेच अंबेश पत्नीला घटस्फोट देण्यासाठी पैशाची मागणी करत होता, परंतु, तिच्या वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद व्हायचा. त्यानंतरच हे प्रकरण उघडकीस आलं आहे.
ADVERTISEMENT











