8 वर्षीय मुलीवर शेजारील तरुणाकडून लैंगिक अत्याचार, लष्करी क्वार्टरमध्ये आढळला मृतदेह, हादरवणारी घटना

Crime News : एका 8 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणातील पीडितेचा मृतदेह हा 24 डिसेंबर रोजी मंगळवारी एका खिंडार पडलेल्या घरात आढळला.

crime news

crime news

मुंबई तक

• 07:14 PM • 18 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

बेपत्ता झालेल्या 8 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

point

19 वर्षीय तरुणाने मुलीचा गळा दाबून केली हत्या

crime news : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत एक मन हेलावणारी घटना घडली आहे. दिल्लीच्या वसंत विहार परिसरातून बेपत्ता झालेल्या 8 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणातील पीडितेचा मृतदेह हा 24 डिसेंबर रोजी मंगळवारी एका लष्करी क्वार्टरमध्ये मृतदेह आढळला होता. पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, 19 वर्षीय शेजारी राहणाऱ्या तरुणाने मुलीचा गळा दाबून हत्या केली.

हे वाचलं का?

हे ही वाचा : मोठी बातमी: माणिकराव कोकटेंचा 'गेम ओव्हर', मुख्यमंत्री नाही तर 'या' नेत्याकडे दिला राजीनामा; कोणत्याही क्षणी होणार अटक

मृतदेह एका पडक्या घरात आढळला 

सोमवारी 23 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास मुलगी घरातून गायब झाली होती. नंतर पालकांनी पोलिसांकडे मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तेव्हा पोलिसांनी आणि स्थानिकांनी मुलीचा शोध घेतला आणि मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह एका पडक्या घरात आढळून आला. संबंधित सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये आरोपीची ओळख पटण्यास मदत झाली, आरोपी हा दुसरा तिसरा कोणीही नसून तो मुलीच्या शेजारीच राहणारा आहे.

हे ही वाचा : 'ते' वचन देऊन ठेवले लैंगिक संबंध, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर मोठी खळबळ

मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर 

या घटनेनंतर शंकर विहार परिसरात मोठ्या प्रमाणात संताप देखील व्यक्त करण्यात आला होता. पीडितेच्या कुटुंबाने आणि स्थानिक रहिवाशांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली आणि आर्मी कंपाऊंडमधील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील आता ऐरणीवर आला आहे. स्थानिक पोलिसांनी प्रशासनाच्या आश्वासनानंतर निदर्शने शांत झाली होती. पोलिसांनी सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. परंतु आता खून आणि इतर गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितलं की, आरोपीला कायद्यान्वये आवश्यक ती शिक्षा दिली जाणार असल्याचे वृत्त आहे. 

    follow whatsapp