ADVERTISEMENT
Maharashtra Weather : महाराष्ट्रात 18 डिसेंबर रोजी एकंदरीत वातावरण स्वच्छ आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर तापमान सामान्य ते उबदार राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये हवेची गुणवत्ता खराब राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात येत आहे, जाणून घेऊयात एकूण हवामानाचा अंदाज.
हे ही वाचा : सरफराजला 'सीएसके'नं दिली संधी, शेअर केलेल्या व्हिडिओनं काळजाचं झालं पाणी, म्हणाला 'माझ्या करिअरला नवं..'
कोकण विभाग :
कोकण विभागात रत्नागिरी, सिंधुदु्र्ग, पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश होतो. कोकण विभागात कमाल तापमानात वाढ दिसून येत आहे. डहाणू येथे 34 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
मध्य महाराष्ट्र विभाग :
मध्य महाराष्ट्रात पुण्यातील कमाल तापमान हे 28 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. तर किमान तापमान हे 9 अंश सेल्सिअस इतकं असेल असा हवामान विभागाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यात धुक्याची अधिक शक्यता आहे.
मराठवाडा विभाग :
मराठवाडा विभागात थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे. या विभागातील प्रमुख शहर हे छत्रपती संभाजीनगर असून येथील तापमान हे 30 अंश सेल्सिअस इतके असेल. तसेच आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : अटकेची टांगती तलावर, कृषी खातं गेलं आता थेट मंत्रिपदच जाणार?.. नेमके कोण आहेत माणिकराव कोकाटे?
विदर्भ विभाग :
विदर्भ विभागात थंडीचा कडाका कायम राहणार असल्याची शक्यता आहे. तसेच विदर्भ विभागातूल पूर्व भागात पारा चांगलाच घसरला आहे. विदर्भातील नागपूर शहरात कमाल तापमान हे 29 अंश सेल्सिअस असेल.
ADVERTISEMENT











