Crime News: उत्तराखंडमधील डेहराडूनच्या प्रतिबिंब पोर्टलवर एक अज्ञात तक्रार दाखल करण्यात आली होती. लूसिफर या टेलिग्राम अकाउंटवर चाइल्ड पोर्नोग्राफी (अश्लील) कंटेंट विकलं जात असल्याचं तक्रारीत म्हटलं होतं. ज्या टेलीग्राम अकाउंटसंदर्भात तक्रार केली गेली, त्याची लिंक मेरठमध्ये आढळली. पुढील तपासादरम्यान, मेरठच्या ब्रह्मपुरी परिसरातील अमित जैन नावाच्या एका तरुणाचा या प्रकरणाशी संबंध असल्याचं आढळून आलं. डेहराडून पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, मेरठ पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांचं पथक आरोपी अमित जैनच्या पत्त्यावर पोहोचले आणि त्यावेळी आमित आता तिथे राहत नसल्याचं पोलिसांना आढळलं. त्यानंतर, पोलिसांच्या पथकाने टेक्निकल तपासासह आरोपी अमित जैनचा शोध घेण्यास सुरूवात केली.
हे ही वाचा: Govt Job: कोणत्याही परीक्षेशिवाय सरकारी संस्थेत सहभागी व्हा! DRDO कडून फ्रेशर्स तरुणांसाठी भरती...
प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास...
टेलीग्रामवर लूसिफर नावाने एक चॅनल चालवलं जात होतं. यावर लहान म्हणजेच अल्पवयीन मुलींचे आक्षेपार्ह व्हिडीओ शेअर केले जात होते. अमित जैन हे चॅनल चालवत असल्याचा आरोप आहे. संबंधित व्हिडीओ नेमके कुठे बनवले गेले? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. नेटवर्कमध्ये आणखी कोणाचा समावेश होता आणि आरोपींना हे साहित्य कसं मिळालं यासह सर्व बाजूंनी प्रकरणाचा तपास केला जात आहे.
हे ही वाचा: "मी तुला विकणार आहे..." मित्रांमध्ये पत्नीचे अश्लील फोटो केले व्हायरल अन्... पीडितेने दाखल केली तक्रार!
चाइल्ड पोर्नोग्राफी कंटेंट विकत असल्याचा आरोप
पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितलं की, डेहराडूनमधील एका अज्ञात तक्रारदाराने भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राचा भाग असलेल्या प्रतिबिंब पोर्टलवर तक्रार दाखल केली होती. तक्रारीत असा आरोप करण्यात आला की, लुसिफर नावाची आयडी असलेला एक व्यक्ती टेलीग्रामवर चाइल्ड पोर्नोग्राफी कंटेट विकत आहे. लिंक नंबर मेरठमधील ब्रह्मपुरी पोलिस स्टेशन परिसरातील अमित जैन यांच्या नावाने रजिस्टर्ड असल्याचं आढळून आलं. आरोपी अमित जैन सध्या तिथे राहत नसल्याचं अधिक तपासात आढळून आलं. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीविरुद्ध कठोरातली कठोर कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT











