Crime News: उत्तर प्रदेशातील लखनऊ येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका तरुणाने त्याच्या आधीच्या प्रेयसीच्या घरात बळजबरीने घुसून तिच्यावर गोळी झाडल्याचं वृत्त आहे. संबंधित घटना गुरुवारी रात्री घडल्याची माहिती आहे. प्रकरणातील आरोपी तरुणाचं नाव आकाश असून त्याने पीडितेवर दोन गोळ्या झाडल्या. एका गोळी तरुणीच्या खांद्याला लागली आणि दुसरी तिच्या हातावर लागल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर, आरोपी आकाश घटनास्थळावरून फरार झाला.
ADVERTISEMENT
पीडितेच्या घरात घुसून भयानक कृत्य
आरोपी आकाश आणि पीडित तरुणी मागील 6 वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. मात्र, कालांतराने आरोपीचा खरा चेहरा पीडितेसमोर आला. त्यामुळे, ती त्याच्यापासून दूर होत गेली. खरं तर, आकाशला दारूचं व्यसन होतं आणि त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी सुद्धा होती. प्रेयसी दूर गेल्यामुळे संतापलेल्या आकाशने पीडितेच्या घरात घुसून भयानक कृत्य केलं.
शारीरिक संबंध अन् सिगारेटचे चटके...
पीडितेच्या आरोपानुसार, आकाश अतिशय हिंसक प्रवृत्तीचा होता. प्रेमसंबंधात असताना त्याने त्याच्या प्रेयसीला खूपदा मारहाण केली. तो तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध करायचा आणि त्यावेळी तिला सिगारेटचे चटके सुद्धा द्यायचा. तरुणीच्या म्हणण्यानुसार, संबंध ठेवताना आरोपी आकाश तिचे अश्लील व्हिडीओ सुद्धा बनवायचा.
तरुणीने तक्रारीत सांगितलं की, आकाश नेहमी त्याची पोलिसांशी ओळख असल्याचा दावा करायचा. त्याने नुकतीच एक स्कॉर्पिओ खरेदी केली होती आणि तो नेहमी पिस्तूल घेऊन फिरायचा. तसेच, आकाश एका सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीत सामील होता आणि त्यातूनच त्याची मोठी कमाई व्हायची. एसटीएफने त्याच्यावर कारवाई केल्यानंतर तिने आकाशसोबतचे प्रेमसंबंध संपवले आणि ती त्याच्यापासून दूर होऊ लागली. त्यानंतर, आकाशने तिला प्रचंड त्रास देण्यास सुरूवात केली.
हे ही वाचा: ठाणे: तरुणीने रॅपिडो बाईक बुक केली अन् निर्जन ठिकाणी नेऊन चालकाचं नको ते कृत्य!
घरात घुसून पीडितेवर गोळ्या झाडल्या
रात्री 2 वाजता आकाश रागाच्या भरात पीडितेच्या घरात घुसला. पीडित तरुणीच्या बहिणीने दिलेल्या जबाबानुसार, घटनेच्या वेळी आरोपी आकाश नशेत होता आणि घरात घुसल्यानंतर त्याने लगेच शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तो जळबरीने तरुणीच्या घरात घुसला आणि त्याने घरातील वस्तूंची तोडफोड केल्याचा देखील आरोप आहे. त्यानंतर, तो त्याच्या प्रेयसीच्या खोलीत गेला आणि तिला पाहताच क्षणी तिच्यावर गोळ्या झाडल्या.
हे ही वाचा: पोलीस कॉन्स्टेबलचा 5 कोटींचा बंगला पाहून ईडीच्या अधिकाऱ्यांना शब्द फुटेनात, प्राडाच्या वस्तू अन् महागड्या ब्रँडची सजावट
पीडितेच्या बहिणीने सांगितलं की, आरोपी तिच्या 7 वर्षांच्या मुलीला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला. सध्या, रुग्णालयात पीडितेवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. तसेच, प्रकरणातील आरोपी फरार असून पोलीस त्याला शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT











