Crime News: विवाहबाह्य प्रेमसंबंधातून एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित घटना उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे घडल्याची माहिती आहे. येथील रहिवासी असलेली अनुपमा पटेल नावाची विवाहित महिला अंगणवाडी शिक्षिका असून एकटीच राहत होती. दरम्यान, अनुपमाची मोहित यादव नावाच्या तरुणाशी ओळख झाली. कालांतराने, त्या दोघांमध्ये जवळीकता वाढत गेली आणि त्यांच्यात शारीरिक संबंध सुद्धा निर्माण झाले. खरं तर, अनुपमाला मोहितपासून गरोदर व्हायचं होतं, पण त्या तरुणाला हे मान्य नव्हतं. अनुपमा नेहमी तिच्या प्रियकरावर मूल होण्यासाठी दबाव आणत होती. याच कारणाला वैतागून, मोहित आणि त्याच्या पत्नीने मिळून अनुपमाला संपवलं.
ADVERTISEMENT
प्रियकरावर अनैतिक संबंधासाठी दबाव...
अनुपमा पटेल उर्फ सीता ही लक्ष्मणपूर येथील शारदा विहार कॉलनीत राहत होती आणि ती तिच्या घरातूनच दुधाचे पॅकेट्स विकून पैसे मिळवायची. मोहित सुद्धा त्याच कॉलनीत भाड्याच्या घरात राहत होता. मोहित बऱ्याचदा अनुपमाकडे दूध घेण्यासाठी यायचा. दरम्यान, त्यांच्यात बोलणं वाढत गेलं आणि कालांतराने त्यांच्यात संबंध निर्माण झाले. खरं तर, अनुपमाला मोहितकडून मूल हवं होतं आणि त्यामुळेच तिने मोहितवर अनैतिक संबंधासाठी दबाव आणल्याचा आरोप आहे. यासाठी, मोहितने नकार दिल्यावर तिने त्याला पोलीस तक्रारीत अडकवण्याची धमकी दिली. दरम्यान, मोहितने अंजली नावाच्या तरुणीसोबत लग्न केलं. परंतु लग्नानंतर सुद्धा अनुपमा त्याच्यावर तिच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होती.
हे ही वाचा: रात्री उशीरा प्रियकराला भेटण्यासाठी गेली पण, अचानक वाट चुकली अन् नंतर... तरुणीसोबत काय घडलं?
बायकोसोबत मिळून केली प्रेयसीची हत्या
यामुळे वैतागलेल्या मोहितने अंजलीला अनुपमाबद्दल सांगितलं. त्यानंतर, त्या दोघांनी मिळून अनुपमाला संपवण्याचा मोठा कट रचला. योजनेप्रमाणे, मोहित आणि अंजली आधी पांडेपूर येथील मिश्रा होमस्टेमध्ये राहिले. 11 डिसेंबर रोजी सकाळी ते अनुपमाच्या घरी निघाले. त्यावेळी, अंजली अनुपमाच्या घरापासून काही अंतरावर थांबली आणि मोहित मागच्या दाराने पीडितेच्या घरात घुसला. त्याने अनुपमाच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि मानेवर दगडी सील आणि स्टीलच्या ड्रमने वार करून तिची हत्या केली.
हे ही वाचा: पतीचे त्याच्या वहिनीसोबत अनैतिक संबंध अन् दिराने केला बलात्कार! सासरी महिला कॉन्स्टेबलसोबत भयानक प्रकार...
पोलिसांचा तपास
इतकेच नव्हे तर, हत्येनंतर आरोपी जोडप्याने पीडितेच्या घरातून चोरी केली. त्यांनी मृत महिलेचे सोन्याचे दागिने, एक मोबाईल फोन आणि काही रोख पैसे घेऊन फरार झाले. पोलिसांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितलं की, संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने तात्काळ कारवाई केली आणि अवघ्या 24 तासांत आरोपी मोहित यादव आणि अंजली चौहान यांना अटक केली. आरोपींनी हत्येच्या वेळी घातलेले रक्ताने माखलेले कपडे, चोरीचे सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि 73,640 रुपये रोख जप्त केले. या खळबळजनक हत्येचा उलगडा करणाऱ्या पोलिस पथकाला 50,000 रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT











