पतीचे त्याच्या वहिनीसोबत अनैतिक संबंध अन् दिराने केला बलात्कार! सासरी महिला कॉन्स्टेबलसोबत भयानक प्रकार...

मुंबई तक

एका महिला कॉन्स्टेबलने आपल्याच पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केल्याचं वृत्त आहे.

ADVERTISEMENT

महिला कॉन्स्टेबलसोबत भयानक प्रकार...
महिला कॉन्स्टेबलसोबत भयानक प्रकार...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पतीचे त्याच्या वहिनीसोबत अनैतिक संबंध अन्...

point

दिराने पीडितेवर केला बलात्कार

point

महिला कॉन्स्टेबलसोबत घडला भयानक प्रकार

Crime News: उत्तर प्रदेशातील नोएडाच्या सेक्टर 20 पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलने आपल्याच पतीविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केल्याचं वृत्त आहे. पीडितेच्या वडिलांनी मोठ्या अपेक्षा ठेवून मुलीचं लग्न पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेल्या एका तरुणासोबत लावून दिलं होतं. त्यांनी लग्नासाठी जवळपास 50 लाख रुपयांहून अधिक खर्च केला. पण कुटुंबियांना अजिबात कल्पना नव्हती की त्यांच्या मुलीला सासरी खूप छळ सहन करावा लागेल. संबंधित महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर, तिला सॅनिटायझर पिण्यास सुद्धा भाग पाडण्यात आलं. 

महिलेने तिची पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार दाखल करताना सांगितलं की, तिच्या दिराने तिच्यासोबत अश्लील कृत्य केलं. तसेच, सासऱ्याने तिला मुलगा होण्यासाठी औषधे घेण्यास भाग पाडलं. पीडितेच्या पतीचे त्याच्या वहिनीसोबत अनैतिक संबंध असल्याचा देखील आरोप आहे. तसेच, लग्नात इतका खर्च करुन सुद्धा सासरचे लोक महिलेकडे स्कॉर्पियो कारची मागणी करायचे. आता, या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. 

हुंडा म्हणून स्कॉर्पिओ कारची मागणी 

26 जानेवारी 2023 रोजी मेरठमधील एका महिला कॉन्स्टेबलचं पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असणाऱ्या तरुणासोबत लग्न झालं. महिलेच्या कुटुंबियांनी हुंडा म्हणून लग्नात जवळपास 50 लाख रुपये खर्च केले. पण लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांतच, पीडितेच्या सासरच्या लोकांनी माहेरहून दिलेल्या वस्तू निकृष्ट दर्जाच्या असल्याचं म्हणायला सुरुवात केली. त्यांनी लगेच दुसऱ्या स्कॉर्पिओ कारची मागणी केली. 

हुंड्यासाठी मारहाण अन् शिवीगाळ 

त्यानंतर, संबंधित महिला स्कॉर्पिओ गाडीची मागणी पूर्ण करू न शकल्याने, तिचा पती, सासू कुंती देवी आणि सासरे राजेश्वर प्रसाद शर्मा यांनी पीडितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यास सुरूवात केली. त्यांनी तिला मारहाण केली आणि शिवीगाळही केली. इतकेच नव्हे तर, तिला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp