रात्री उशीरा प्रियकराला भेटण्यासाठी गेली पण, अचानक वाट चुकली अन् नंतर... तरुणीसोबत काय घडलं?

मुंबई तक

एक तरुणी तिच्या प्रियकराच्या घरी जाण्यासाठी निघाली आणि रस्त्यावरून जात असताना वाट चुकली. अखेर, ती मदतीसाठी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. पुढे काय घडलं? जाणून घ्या.

ADVERTISEMENT

तरुणी अचानक वाट चुकली अन् नंतर...
तरुणी अचानक वाट चुकली अन् नंतर...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रात्री उशीरा प्रियकराला भेटण्यासाठी गेली

point

पण, अचानक वाट चुकली अन् नंतर...

point

तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

Crime News: उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील शाहपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पादरी बाजारात एक तरुणी तिच्या प्रियकराच्या घरी जाण्यासाठी निघाली आणि रस्त्यावरून जात असताना वाट चुकली. अखेर, ती मदतीसाठी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. संबंधित घटना गुरूवारी घडली असून या प्रकरणामुळे स्थानिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. 

प्रियकराचं घर शोधताना रस्ता चुकली अन्... 

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री जवळपास 11:30 वाजताच्या सुमारास एका तरुणी पादरी बाजार परिसरात फिरताना दिसली. ती आपल्या प्रियकराच्या शोधात मानस विहार कॉलनीमध्ये पोहोचली होती. मात्र,  प्रियकराच्या घराचा शोध घेऊन आणि त्या ठिकाणी बराच वेळ वाट पाहून सुद्धा तिला तरुणाबद्दल काहीच कळलं नाही. अचानक रस्ता चुकल्यामुळे आणि रात्री उशीरा ती एकटीच असल्याने ती खूप घाबरली. दरम्यान, तिला बाजाराच्या परिसरात पोलीस स्टेशन दिसलं. 

पीडितेने पोलिसांना काय सांगितलं? 

पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर, तिने पोलिसांनी सत्य घटना सांगण्यास टाळाटाळ केली आणि त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पीडिता पोलिसांना म्हणाली की, ती संगम चौराहा येथील मानस विहार कॉलनीची रहिवासी आहे आणि आता ती रस्ता चुकली आहे. परंतु, पोलिसांना तिच्यावर संशय आला आणि त्यांनी तरुणीची सखोल चौकशी केली. कठोर चौकशी केली असता तरुणीने पोलिसांना अखेर सत्य सांगितलं. 

हे ही वाचा: ठाणे: पत्नीसोबत सतत वाद, शेवटी मित्रांना सांगून विषारी साप आणला अन्... महिलेसोबत घडलं भयानक!

पीडितेने पोलिसांना सांगितलं की ती मूळची देवरिया जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या गोरखपूरच्या बेतियाहाता परिसरात भाडेतत्त्वावर राहते. या काळात, संगम चौराहा परिसरातील एका तरुणाशी तिची ओळख झाली आणि कालांतराने त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. गुरुवारी रात्री त्यांचे फोनवर बोलणे झालं आणि त्यानंतर, ती तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी मानस विहार कॉलनीत पोहोचली. मात्र, तरुणाचं घर शोधत असताना ती रस्ता चुकली. त्यावेळी, तिने खूप वेळा तिच्या प्रियकराला फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तरुणाने तिचा फोन उचलला नाही. 

हे वाचलं का?

    follow whatsapp