धक्कादायक... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावापासून जवळच सापडला 115 कोटींचा ड्रग्स साठा; क्राईम ब्रांचने 'असा' मारला छापा!

Satara Drugs: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावाजवळील सावरी या गावातील एका ड्रग्स कारखान्यावर छापा मारण्यात आला. मुंबई क्राईम ब्रँचने केलेल्या या कारवाईत तब्बल 115 कोटींचं ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे.

a drug consignment worth 115 crore rupees was found near deputy chief minister eknath shindes village mumbai crime branch conducted raid in satara

एकनाथ शिंदे यांच्या गावाजवळच सापडला 115 कोटींचा ड्रग्स साठा

इम्तियाज मुजावर

13 Dec 2025 (अपडेटेड: 13 Dec 2025, 07:44 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

114 ते 115 कोटी रुपयांचा एमडी ड्रग्स साठा, मशिनरी आणि मुद्देमाल जप्त

point

सातारा जिल्ह्याच्या इतिहासातील आतापर्यंतची सगळ्यात मोठी ड्रग्स कारवाई

point

चौकशीतून ड्रग्स रॅकेटची मोठी साखळी उघड होण्याची शक्यता

सातारा: महाराष्ट्रात एक खळबळ उडवणारी घटना घडली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मूळ गाव दरेपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर, सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात कोट्यवधी रुपयांचा एमडी (मेफेड्रोन) ड्रग्स कारखाना उघडकीस आला. मुंबई क्राईम ब्रँचच्या विशेष पथकाने आज (13 डिसेंबर) गावात धडक कारवाई करून कारखाना उद्ध्वस्त केला. या छाप्यात चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, प्राथमिक अंदाजानुसार मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून तपास सुरू असल्याने राजकीय पाठिंबा किंवा वरदहस्त असल्याची शक्यताही तपासात समोर येईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे वाचलं का?

छाप्याची पार्श्वभूमी

सावळी गाव हे जावळी तालुक्यातील एक शांत ग्रामीण भाग आहे, जो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मूळ गाव दरे (महाबळेश्वर तालुका, पूर्वी जावळी) पासून सुमारे 15-20 किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव कोयना नदीच्या काठावर वसलेले असून, पर्यटन आणि शेतीवर अवलंबून आहे. मात्र, या शांत गावात गुप्तपणे चालू असलेल्या ड्रग्स कारखान्याचा पर्दाफाश झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आश्चर्य आणि भीती निर्माण झाली आहे.

माहितीनुसार, मुंबई आणि पुण्यातील अलीकडील ड्रग्स प्रकरणांनंतर पोलिसांना सावळी गावात संशयित कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाली होती. मुंबई क्राईम ब्रँचने या माहितीची पडताळणी करून गुरुवार रात्रीपासून गुप्त तपास सुरू केला. त्यानंतर आता त्यावर छापा टाकला. या शेडमध्ये एमडी ड्रग्स तयार करण्याचे यंत्रसामग्री, रसायने आणि तयार ड्रग्सचा मोठा साठा सापडला. प्राथमिक अंदाजानुसार, जप्त ड्रग्सची किंमत तब्बल 114 ते 115 कोटी रुपये एवढी आहे.

हे ही वाचा>> महाराष्ट्रातून लहान मुलं, मुली पळवल्या जातायत, राज ठाकरेंनी एनसीआरबी अहवालाचा दाखला देत फडणवीसांना सुनावलं..

आज सकाळपासून सुरू असलेल्या या धडक कारवाईत सुमारे 114 ते 115 कोटी रुपयांचा एमडी (मेफेड्रोन) ड्रग्स साठा, उत्पादन यंत्रसामग्री आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही सातारा जिल्ह्याच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी ड्रग्स कारवाई असल्याचे समोर येत आहे.

मुंबई क्राईम ब्रँचच्या विशेष पथकाने सावरी गावातील झाडी-जंगलाच्या आड एका शेडमध्ये चालू असलेल्या एमडी ड्रग्स उत्पादन कारखान्यावर छापा टाकला. प्राथमिक माहितीनुसार, या शेडमध्ये एमडी ड्रग्सची मोठ्या प्रमाणात निर्मिती सुरू होती. छाप्यात तीन कारागीरांसह एक स्थानिक व्यक्ती अशा एकूण चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

राजकीय वर्तुळात खळबळ 

या प्रकरणाची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. ज्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला ते गाव राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या प्रचंड मोठ्या कारवाईनंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. विरोधी पक्षांनी या प्रकरणावरून सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

हे ही वाचा>> Inside Story: अमित शाहांनी एका Meeting मध्ये फिरवला सगळा गेम, शिंदेंना पुन्हा केलं आपलंसं अन् रवींद्र चव्हाणांना दिला ‘तो’ आदेश!

ड्रग्सविरुद्ध राज्य सरकारची भूमिका

महाराष्ट्र सरकारने अलीकडेच ड्रग्सविरुद्ध मोठी मोहीम सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ड्रग्स प्रकरणांवरून कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. 

पोलिसांकडून संशयितांची कसून चौकशी सुरू आहे. एमडी ड्रग्स उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांचा स्रोत, वितरण नेटवर्क आणि आर्थिक व्यवहारांची माहिती उघड होण्याची शक्यता आहे. हे प्रकरण महाराष्ट्रातील ड्रग्सच्या वाढत्या धोक्याकडे लक्ष वेधते. पोलिसांच्या तपासानुसार अधिकृत माहिती समोर येण्याची वाट पाहावी लागेल. सध्या राजकीय आणि सामाजिक चर्चांना उधाण आले असून, हे प्रकरण विधानसभेतही उपस्थित होण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp