Crime News : एका 14 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही विद्यार्थिनी आपल्या मैत्रिणीसोबत इयत्ता आठवीची परीक्षा देण्यासाठी घराबाहेर पडली होती. वाटेत बाईकवरुन आलेल्या चार नराधमांनी तिला उचलून नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. मध्यप्रदेशाती मऊगंज जिल्ह्यातील ही बातमी आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : विवाहित पोलिसासोबत लिव्ह-इन; वाद होताच सर्व्हिस रिव्हॉल्वर घेतली अन्..., तरुणीचा टोकाचा निर्णय
परीक्षेसाठी बाहेर पडली होती
ही माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना आहे. एका 14 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी 10.30 च्या सुमारास ही विद्यार्थिनी आपल्या मैत्रिणीसोबत इयत्ता आठवीची पूर्व-बोर्ड परीक्षा देण्यासाठी घराबाहेर पडली होती. वाटेत दोन दुचाकींवरून आलेल्या चार नराधमांनी या दोन्ही विद्यार्थिनींना अडवले आणि मैत्रिणीला तिथेच सोडून पीडित मुलीचे जबरदस्तीने अपहरण केले.
जंगलात नेऊन बलात्कार
आरोपींनी या विद्यार्थिनीला काहीतरी नशिल्या पदार्थाचे प्राशन करायला लावून बेशुद्ध केले आणि त्यानंतर तिला जंगलात नेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार केला. घटनेनंतर ही मुलगी जंगलात बेशुद्धावस्थेत सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मुलीला मऊगंज येथील रुग्णालयात दाखल केले. नशेत असल्यामुळे आणि मानसिक धक्का बसल्यामुळे गुरुवारी तिची साक्ष नोंदवता आली नव्हती, मात्र प्रकृती स्थिर झाल्यानंतर आता पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.
हे ही वाचा : 'वैभव सूर्यवंशीला तात्काळ अटक करा..' परदेशी क्रिकेट बोर्डाची टिप्पणी; नेमकं काय घडलं?
आईने दाखल केली तक्रार
मऊगंज पोलिसांनी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन या नराधमांविरुद्ध 'पॉक्सो' आणि सामूहिक बलात्काराच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अत्यंत वेगाने तपासचक्रे फिरवत एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून, फरार असलेल्या इतर तीन आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
ADVERTISEMENT











