विवाहित पोलिसासोबत लिव्ह-इन; वाद होताच सर्व्हिस रिव्हॉल्वर घेतली अन्..., तरुणीचा टोकाचा निर्णय

मुंबई तक

• 06:04 PM • 06 Feb 2026

Crime News : एका पोलिसासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीने पोलिसाच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरने स्वत:वरच गोळी झाडल्याची घटना उघडकीस आली आहे. आशिष पवार असं त्या पोलिसाचं नाव असून दिल्ली पोलिसात तो हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. 4 ते 5 वर्षांपासून दोघांची मैत्री असून गेल्या काही महिन्यांपासून ते एकत्र रहात होते. विशेष म्हणजे आशिष हा आधीपासूनच विवाहित आहे. तरुणीनं स्वत:वर का गोळी झाडली, जाणून घेऊया.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

विवाहित पोलिसासोबत लिव्ह-इन

point

वाद होताच सर्व्हिस रिव्हॉल्वर घेतली अन्..., तरुणीचा टोकाचा निर्णय

Crime News : एका पोलिसासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीने पोलिसाच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरने स्वत:वरच गोळी झाडल्याची घटना उघडकीस आली आहे. आशिष पवार असं त्या पोलिसाचं नाव असून दिल्ली पोलिसात तो हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. 4 ते 5 वर्षांपासून दोघांची मैत्री असून गेल्या काही महिन्यांपासून ते एकत्र रहात होते. विशेष म्हणजे आशिष हा आधीपासूनच विवाहित आहे. तरुणीनं स्वत:वर का गोळी झाडली, जाणून घेऊया.

हे वाचलं का?

हे ही वाचा : अभिनेते राजपाल यादव सरेंडर, थेट तिहार जेलमध्ये रवानगी, असं काय घडलं?

बायकोचा फोन आल्याने वाद

ग्रेटर नोएडा येथील राधा स्काय गार्डन सोसायटीमध्ये गुरुवारी रात्री एका पार्टीदरम्यान दिल्ली पोलिसांच्या हेड कॉन्स्टेबलच्या प्रेयसीने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. दिल्ली पोलिसांच्या कालिंदी कुंज पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला हेड कॉन्स्टेबल आशिष पवार हा विवाहित असून, त्याचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात प्रलंबित आहे. तो गेल्या 4-5 वर्षांपासून पीडित तरुणीचा मित्र होता आणि मागील काही महिन्यांपासून ते दोघे या सोसायटीत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. गुरुवारी रात्री आशिष, त्याची प्रेयसी आणि तिची एक मैत्रीण पार्टी करत असताना आशिषच्या फोनवर त्याच्या पत्नीचा फोन आल्याने त्यांच्यात जोरदार वाद झाला.

सर्व्हिस रिव्हॉल्वर घेतली आणि स्वत:ला कोंडलं

या वादातून संतप्त झालेल्या तरुणीने आशिषची सर्व्हिस रिव्हॉल्वर घेतली आणि स्वतःला खोलीत कोंडून घेतले. तिने आतून गोळी झाडून घेतल्याचा आवाज येताच दरवाजा तोडून तिला बाहेर काढण्यात आले आणि तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या तरुणीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून तिला व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्राथमिक तपासानंतर हा आत्महत्येचा प्रयत्न असल्याचे सांगितले.

हे ही वाचा : कागदोपत्री मेलेला आरोपी भररस्त्यात स्कूटी चालवताना सापडला; 12 वर्षानंतर कसं बाहेर आलं प्रकरण?

हेड कॉन्स्टेबल ताब्यात

एडीसीपी आर.के. गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीला गोळी लागल्याने झालेली जखम असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी हेड कॉन्स्टेबल आशिष पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची सखोल चौकशी केली जात आहे. पोलीस या प्रकरणातील सर्व बाजूंचा तपास करत असून पार्टीत उपस्थित असलेल्या इतर व्यक्तींचे जबाब नोंदवले जात आहेत.