'आत्यानं आणि पप्पांनी आईला मारलं', 4 वर्षाच्या चिमुरड्यानं सांगितला घटनेचा थरार, अखेर महिलेनं...

crime news : कौटुंबिक वादातून एका महिलेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती 4 वर्षाच्या चिमुरड्याने सांगितली आहे.

crime news

crime news

मुंबई तक

14 Dec 2025 (अपडेटेड: 14 Dec 2025, 06:47 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

कौटुंबिक वादातून महिलेची आत्महत्या

point

व्हिडिओ कॉल सुरु असताना काय घडलं?

point

पोटच्या लेकरानं सांगितला घटनेचा थरार 

Crime News : एका कौटुंबिक वादातून एका महिलेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोनिका (वय 25) असे महिलेचं नाव आहे. पती आणि नणंद नेहमी मोनिकाला मारहाण करायचे. याच त्रासाला कंटाळून मोनिकाने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना उत्तर प्रदेशातील झांसीमध्ये घडली आहे. या प्रकरणाची माहिती मोनिकाच्या 4 वर्षीय मुलाने दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला आता सुरुवात केली.

हे वाचलं का?

हे ही वाचा : OYO हॉटेलवर बायको शिक्षकासोबत पोहोचली, नवऱ्यानं पाहिलं नंतर... व्हिडिओ तुफान व्हायरल

नेमकं काय घडलं?

मोनिकाचा 2020 मध्ये शिवम दुबेसोबत विवाह झाला होता. मोनिका ही आपल्या चार वर्षांचा मुलगा ओमसोबत सासरी राहत होती. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या शाळेच्या फीवरून दोघांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. हा वाद गेली अनेक वर्षांपासून व्हायचा, अशी माहिती समोर आली. शिवम हा दोन महिन्यांपासून बंगळुरुत राहत असल्याचे वृत्त समोर आले. मंगळवारी पैशांच्या कारणावरून दोघांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता.

व्हिडिओ कॉल सुरु असताना काय घडलं?

बुधवारी सकाळी पुन्हा हाच वाद वाढला होता. याच प्रकरणात कोमलने सांगितलं की, व्हिडिओ कॉल सुरु असताना नणंदेनं मोनिकाला ढकललं आणि नंतर तिला पाडलं. पती, सासू आणि नणंदेनं मिळून मोनिकाला बेदम मारहाण केली. फोनवरून त्यांना अनेकदा रोखण्यात आले असता, मृतदेह घराबाहेर ठेवून त्याच्यावर अंत्यसंस्काराची तयारी सुरुवात करण्यात आली होती. पण, ऐनवेळी पोलिसांनी अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला. पोलिसांनी अंत्यसंस्कार थांबवल्यानंतर मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता.

हे ही वाचा : 'या' राशीतील लोकांचा आजचा दिवस कठीण जाणार, तर काहींच्या प्रगतीत अडथळे निर्माण होणार

पोटच्या लेकरानं सांगितला घटनेचा थरार 

या प्रकरणी आता मोनिकाच्या चार वर्षांच्या मुलीने आरोपी वडिलांनी आणि आत्याने आईला बेदम मारहाण केली, असं रडत सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याने भांडणाचे फोटो काढल्याचा दावा करण्यात आला होता. याच प्रकरणात आता शहर कोतवाली परिसरातील नातेवाईकांकडून तक्रार झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. सध्या शवविच्छेदनासाठी अहवालाची प्रतिक्षा करण्यात आली.

    follow whatsapp