बहिणीच्या प्रेमविवाहावर भाऊ संतापला, तरुणाने दाजीला बोलेरोने जागीच चिरडलं.... भयंकर कांड

Crime News : प्रेमप्रकरणातून एका तरुणाच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बहिणीच्या प्रेमविवाहामुळे नाराज असलेल्या एका भावावर त्याचा मेहुण्याला बोलेरो गाडीने चिरडून ठार केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या गुन्ह्याचा उलगडा पोलिसांनी केला. संबंधित प्रकरणात त्यांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे, या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी केली जात आहे. 

Crime News

Crime News

मुंबई तक

• 04:20 PM • 02 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

नेमकं काय घडलं? 

point

प्रेमविवाहाच्या रागातून भावाने दाजीला गाडीने ठोकर देत संपवलं

Crime News : प्रेमप्रकरणातून एका तरुणाच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बहिणीच्या प्रेमविवाहामुळे नाराज असलेल्या एका भावावर त्याचा मेहुण्याला बोलेरो गाडीने चिरडून ठार केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या गुन्ह्याचा उलगडा पोलिसांनी केला. संबंधित प्रकरणात त्यांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे, या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी केली जात आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : मुलगी घरी एकटीच असताना बारावीचा मुलगा घरात शिरला, मैत्रिणीच्या वडिलांनी पाहताच...

नेमकं काय घडलं? 

25 फेब्रुवारी रोजी भचौ जिल्ह्यातील हिम्मतपुरा फुलवाडी भागात एक तरुणाला बोलेरो कारने धडक दिली. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला, या प्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत. पोलीस तपासातून मृताची ओळख पटली आहे. मृताचे नाव विनोद असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलीस तपासात संशयित आणि मृत यांच्यात संबंध असल्याचे उघड झाले आणि हा अपघात नसून हत्या असल्याची माहिती समोर आली. 

प्रेमविवाहाच्या रागातून भावाने दाजीला गाडीने ठोकर देत संपवलं

विनोदचे आरोपी मेहुलची बहीण शिल्पाशी प्रेमविवाह झाला होता, आरोपी मेहुल हा दुखी होता. एवढंच नाहीतर, एका वर्षांपूर्वी  बाईकने दिलेल्या धडकेवरून दोघांमध्ये वाद झाला होता. एका जुन्या वादातूनच विनोदला मारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रकरणी मित्र हर्षदला याबाबतची माहिती देण्यात आली होती. दोघांनी मिळून हत्येचे पूर्ण योजनाच रचली होती.

 25 फेब्रुवारी रोजी रात्री विनोद हिम्मतपुरा फुलवाडी परिसरातून जात होता. आरोपी मेहुल आणि हर्षदने बोलेरो कारने धडक दिली. या धडकेत विनोद गंभीरला जखमी केलं आणि त्यातच त्याचा करुण अंत झाला. यानंतर दोघेही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. 

हे ही वाचा : लग्न झाल्यानंतरही एक्स बॉयफ्रेंड त्रास द्यायचा, शेवटी तरुणीने घरी बोलवून केला खून, ओळख पटू नये म्हणून ॲसिड फेकलं

पोलिसांनी सापळा रचून दोघांना पकडले. भौच पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहिता 2023 कलमांन्वये 103(1) आणि 54 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत. 

    follow whatsapp