13 वर्षाच्या मुलाने 10 वर्षाच्या मुलीला मक्याच्या शेतात नेत केले अत्याचार, नंतर गळा चिरून संपवलं

मुंबई तक

02 Mar 2026 (अपडेटेड: 02 Mar 2026, 05:41 PM)

Crime news : रविवारी सकाळी 10 वर्षाच्या मुलीचा मृतदेह मक्याच्या शेतात आढळून आला होता. मुलीचा गळा चिरून नंतर खून करण्यात आला. पोलिसांनी त्याच गावातील एका 13 वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतले आणि नंतर चौकशी केली. प्राथमिक तपासातून मुलाने मुलीच्या गळ्यावर कुदळीने हल्ला करत हत्या केल्याचा कबुलीनामा दिला. 

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुलीचा मृतदेह मक्याच्या शेतात आढळला

point

पीडितेला शेतात नेत अत्याचार केला

Crime news : बिहारच्या कटिहार जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कोइरा पोलीस ठाणे परिसरातील कोलासी पोलीस छावणीअंतर्गत येणाऱ्या गावात रविवारी सकाळी 10 वर्षाच्या मुलीचा मृतदेह मक्याच्या शेतात आढळून आला होता. मुलीचा गळा चिरून नंतर हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी त्याच गावातील एका 13 वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी केली. प्राथमिक तपासातून मुलाने मुलीच्या गळ्यावर कुदळीने हल्ला करत हत्या केल्याचा कबुलीनामा दिला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बहिणीच्या प्रेमविवाहावर भाऊ संतापला, तरुणाने दाजीला बोलेरोने जागीच चिरडलं.... भयंकर कांड

मुलीचा मृतदेह मक्याच्या शेतात आढळला

शनिवारी दुपारपासून मुलगी ही बेपत्ता होती. कुटुंबाने शोध घेतला असता, याबाबत कोणालाही काहीही माहिती मिळाली नाही. रविवारी सकाळी कुटुंबाने पोलीस अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली होती. पोलिसांनी तपास केला असता, मुलीचा मृतदेह हा मक्याच्या शेतात आढळून आला होता. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास केला, मुलीचा गळा चिरून खून करण्यात आल्याचे आढळले. 

मुलीसोबत काही गैरकृत्य झाल्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर याची पुष्टी देखील करता येईल. तपासादरम्यान, पोलिसांनी शेताकडे येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचीही चौकशी केली. या क्रमाने, एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत चौकशी करण्यात आली, त्यानंतर हे प्रकरण बाहेर आले.  

पीडितेला शेतात नेत अत्याचार केला

चौकशीदरम्यान मृताने तिच्या कुटुंबाला ड्रग्जच्या व्यसनाबाबत सांगितले होते, यामुळे तो संतापून गेला होता. याच कारणास्तव त्याने तिला शेतात नेऊन अत्याचार केला. संबंधित प्रकरणाच्या घटनेला दुजोरा देत उपविभागीय पोलिसांनी सांगितलं की, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. 

हे ही वाचा : मुलगी घरी एकटीच असताना बारावीचा मुलगा घरात शिरला, मैत्रिणीच्या वडिलांनी पाहताच...

प्रथमदर्शनी असे दिसते की, ही हत्या अल्पवयीन मुलाने केली. संबंधित प्रकरणात इतर बाबींवर तपास सुरु करण्यात आला. या घटनेनंतर गावात शोक व्यक्त केला जात आहे. ग्रामस्थांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करत आहेत.