लग्न झाल्यानंतरही एक्स बॉयफ्रेंड त्रास द्यायचा, शेवटी तरुणीने घरी बोलवून केला खून, ओळख पटू नये म्हणून ॲसिड फेकलं

Crime News UP : मृत तरुण आझमगड येथील रहिवासी पंकज गुप्ता असून त्याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. संबंधित तरुणीचे लग्न झाल्यानंतर तिने पंकजशी असलेले नाते तोडून टाकले होते, मात्र पंकज तिला जुन्या अश्लील क्लिप्स दाखवून वारंवार धमकावत होता.

Crime News UP

Crime News UP

मुंबई तक

02 Mar 2026 (अपडेटेड: 02 Mar 2026, 12:07 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

लग्न झाल्यानंतरही एक्स बॉयफ्रेंड त्रास द्यायचा

point

शेवटी तरुणी घरी बोलवून केला खून

point

ओळख पटू नये म्हणून ॲसिड फेकलं

Crime News UP : उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात एका महिलेने एक्स बॉयफ्रेंडच्या सततच्या त्रासाला कंटाळून त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतरही अश्लील व्हिडिओच्या जोरावर ब्लॅकमेल करणाऱ्या प्रियकराचा काटा काढण्यासाठी महिलेने आपल्या पती आणि माहेरच्या लोकांसोबत मिळून हत्येचा कट रचला. ओळख पटू नये म्हणून आरोपींनी मृताच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकून तो विद्रूप केला होता. 10 फेब्रुवारी रोजी रसडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहटा गावाजवळ पोलिसांना एक अज्ञात मृतदेह सापडल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला होता.

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुण आझमगड येथील रहिवासी पंकज गुप्ता असून त्याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. संबंधित तरुणीचे लग्न झाल्यानंतर तिने पंकजशी असलेले नाते तोडून टाकले होते, मात्र पंकज तिला जुन्या अश्लील क्लिप्स दाखवून वारंवार धमकावत होता. या ब्लॅकमेलिंगमुळे त्रस्त झालेल्या महिलेने ही सर्व आपबिती आपल्या वहिनीला आणि भावाला सांगितली. त्यानंतर या त्रासातून कायमची सुटका करून घेण्यासाठी संपूर्ण कुटुंबाने मिळून पंकजला रस्त्यातून हटवण्याची योजना आखली.

हेही वाचा : मुलाच्या डोक्यात हातोड्याने ठोकला अडीच इंचाचा लोखंडी खिळा, वडील अन् भावाचं कृत्य; मुलाचं काय झालं?

5 फेब्रुवारी रोजी एका लग्न समारंभादरम्यान या हत्येची पूर्ण रणनीती आखण्यात आली. योजनेनुसार, 7 फेब्रुवारी रोजी महिलेने पंकजला भेटण्याच्या बहाण्याने एका निर्जन ठिकाणी बोलावले. पंकज तिथे पोहोचताच महिला, तिचा पती, भाऊ आणि इतर नातेवाईकांनी मिळून त्याची हत्या केली. हत्येनंतर त्याची ओळख पटू नये या उद्देशाने आरोपींनी त्याच्या चेहऱ्यावर ॲसिड ओतले आणि मृतदेह लोहटा गावाजवळ फेकून दिला. पोलिसांनी तीन दिवसांच्या मेहनतीनंतर मृताची ओळख पटवून तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

बलियाचे पोलीस अधीक्षक ओमवीर सिंह यांनी सांगितले की, सर्व्हिलन्स आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी प्रेयसी, तिचा पती आणि माहेरच्या लोकांसह एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली असून, फरार असलेल्या इतर दोन आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 


'मी तुझं नाव लिहून जात नाहीये..' बायकोच्या अनैतिक संबंधांना वैतागून तरुणाची आत्महत्या; बायकोला केला शेवटचा मेसेज

    follow whatsapp