विवाहित महिलेला अश्लील व्हिडिओ दाखवायचा पंकज, तिनं तरुणाला भेटायला बोलावले अन्...

Crime News : प्रेमसंबंधातून सूड घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 10 फेब्रुवारी रोजी लोहटा गावात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृताचा चेहरा अॅसिड टाकून जाळला. पण, पोलिसांनी डोकं लावून हल्लेखोरांचा तपास केला.

Crime News

Crime News

मुंबई तक

02 Mar 2026 (अपडेटेड: 02 Mar 2026, 07:40 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

आरोपी अश्लील व्हिडिओ दाखवून महिलेला ब्लॅकमेल करायचा

point

अपशब्द आणि मानसिक छळाला कंटाळून महिलेनं कट रचून खल्लास केलं

Crime News : उत्तर प्रदेशातील बलियामध्ये रसरा भागातून प्रेमसंबंधातून सूड घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 10 फेब्रुवारी रोजी लोहटा गावात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृताचा चेहरा अॅसिड टाकून जाळला. पण, पोलिसांनी डोकं लावून हल्लेखोरांचा तपास केला. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव पंकज गुप्ता असे आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 13 वर्षाच्या मुलाने 10 वर्षाच्या मुलीला मक्याच्या शेतात नेत केले अत्याचार, नंतर गळा चिरून संपवलं

आरोपी अश्लील व्हिडिओ दाखवून महिलेला ब्लॅकमेल करायचा

पंकज हा आझमगड येथील रहिवासी होता. पंकजचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते, त्या तरुणीचा विवाह देखील झाला. संबंधित प्रकरणात असा आरोप करण्यात आला की, पंकज तिला अश्लील व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करण्यात आले, तिचे वैवाहिक जीवन नर्क झाले होते. 

अपशब्द आणि मानसिक छळाला कंटाळून पंकजला संपवण्याचा कट

अपशब्द आणि मानसिक छळाला कंटाळून, तरुणीने तिच्या भावाला आणि वहिनीला एकूण घटनेचं सत्य सांगितलं. 5 फेब्रुवारी रोजी एका लग्नसमारंभात, कुटुंबाने पंकजला संपवण्याचा कट रचला होता. एक कटाचा भाग म्हणून पंकजला भेटाण्याच्या बहाण्याने बोलावले. तिथे मुलीच्या कुटुंबीयांनी मिळून त्याचा गळा दाबून निर्घृण हत्या केली.

हे ही वाचा : बहिणीच्या प्रेमविवाहावर भाऊ संतापला, तरुणाने दाजीला बोलेरोने जागीच चिरडलं.... भयंकर कांड

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत प्रेयसीसह तीन मुख्य आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या गुन्ह्याचा कबुलीनामा दिला आहे. संबंधित हत्येत पाच जणांची नावे समोर आली आहे. यापैकी तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्यात. इतर आरोपी हे फरार आहेत.  

    follow whatsapp