हाथरस (उत्तर प्रदेश): लग्नानंतर उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या नवऱ्याला हे माहीत नव्हते की, त्याची नवी नवरीच त्याच्या जीवावर उठलेली असेल. 21 फेब्रुवारी रोजी झालेल्या भव्य लग्नानंतर, 22 फेब्रुवारी रोजी लग्नाची पहिली रात्र आली तेव्हा नवऱ्या मुलीने आपल्या पतीसोबत जे केलं त्याने सर्वच जण हादरले आहेत. नवरा जेव्हा नववधूच्या जवळ गेला त्याचवेळी तिने पतीवर चाकूने वार केले. ज्यामुळे एकच गोंधळ उडाला. लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरी असं का केलं याचं कारण जेव्हा समोर आलं तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला.
ADVERTISEMENT
"जर तू मला स्पर्श केलास तर मी तुला मारून टाकीन."
पीडित नवऱ्याने त्याची कहाणी सांगताना म्हटलं की, 22 फेब्रुवारीच्या रात्री 9 वाजता, जेव्हा तो त्याच्या पत्नीजवळ आला तेव्हा ती अचानक संतापली. ती ओरडली, "माझ्यापासून दूर राहा, नाहीतर मी तुला मारून टाकीन." यावर नवरदेव काही बोलणार देण्याआधीच तिने चाकू बाहेर काढला आणि हल्ला केला. यामध्ये नवरदेवाच्या हातावर वार झाला आणि त्यात गंभीर जखमी झाला.
हे ही वाचा>> विवाहित महिलेला अश्लील व्हिडिओ दाखवायचा पंकज, तिनं तरुणाला भेटायला बोलावले अन्...
नवऱ्यासह सासरकडील मंडळींना दिलं गुंगीचं औषध अन्...
घटनेनंतर दुसऱ्या दिवशी वधूच्या पालकांना बोलावण्यात आले. मुलीची आई, काका आणि काकू यांनी "नवीन लग्नांमध्ये अशा गोष्टी घडतात, शेवटी सर्व काही चांगले होईल" असे सांगून परिस्थिती शांत केली. पण नव्या नवरीच्या मनात काही तरी वेगळंच सुरू होतं. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी तिने सासरकडील सर्व लोकांना जेवणं वाढलं. ज्यामध्ये तिने गुंगीचं औषध मिसळलं होतं. नवरा आणि कुटुंबातील इतर सदस्य बेशुद्ध झाल्यावर नव्या नवरीने तात्काळ घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि लाखो रुपयांची रोकड पळवून नेली.
हे ही वाचा>> रात्री मोबाईलवरून झाला वाद, उडी मारत महिलेनं जीवन संपवल्याचा संशय, अंगणात आढळला मृतदेह
'प्रेयसी काका'सोबत कट रचला
सकाळी कुटुंबीय शुद्धीत आले तेव्हा घरातील दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. नववधू गायब होती आणि तिजोरी रिकामी होती. तपासात असे दिसून आले की, वधूचे तिच्याच काकासोबत दीर्घकाळापासून प्रेमसंबंध होते. तिने लग्न केले आणि संधी मिळताच त्याच्यासोबत पळून गेली.
पोलिसांची कारवाई
पीडिताने पोलीस ठाण्यात पत्नी आणि तिच्या प्रियकर काकाविरुद्ध फसवणूक, चोरी आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि फरार काका-पुतणीचा शोध घेण्यासाठी छापे टाकत आहेत.
ADVERTISEMENT











