रात्री होणाऱ्या बायकोचा फोन आला अन् सकाळी मृतावस्थेत आढळला, लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणासोबत काय घडलं?

एका तरुणाने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली आहे. होणाऱ्या बायकोशी फोनवर बोलून झाल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. फोनवर नेमकं काय बोलणं झालं याचा तपास सुरु आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

16 Apr 2026 (अपडेटेड: 16 Apr 2026, 02:36 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

रात्री होणाऱ्या बायकोसोबत फोनवर बोलला

point

सकाळी गमावला जीव

point

तरुणासोबत काय घडलं?

Crime News : बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील एका गावात खळबळजनक घटना घडली आहे. गावातील तरुण बिट्टू कुमार याने गळफास लावून आत्महत्या केल्याने संपूर्ण गावात सन्नाटा पसरला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांवर बिट्टूचे लग्न येऊन ठेपले होते. 7 मे रोजी त्याचे लग्न निश्चित झाले होते आणि घरात लग्नाची लगबग सुरू असतानाच काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हे वाचलं का?

एकुलत्या एका मुलाची आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सकाळी बिट्टूच्या खोलीचा दरवाजा बराच वेळ उघडला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी काळजीपोटी खिडकीतून डोकावून पाहिले असता त्यांना धक्काच बसला. बिट्टूचा मृतदेह छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. बिट्टू हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता आणि वेल्डिंगचे काम करून आपल्या लहान बहिणीसह संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. ज्या घरात लग्नाचे निमंत्रण पत्रिका वाटप सुरू होते, तिथे आता शोककळा पसरली आहे.

हे ही वाचा : 'आईची अवस्था बघवत नाही..' आजारी आईला चौथ्या मजल्यावरुन खाली ढकलून संपवले; मुलगा काय म्हणाला?

रात्री फोनवर बोलातना काय झाले?

पोलिस तपासात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे की, आत्महत्या करण्यापूर्वी बिट्टू त्याच्या होणाऱ्या पत्नीशी फोनवर तासनतास बोलत होता. या दोघांचे लग्न ठरले होते आणि काही विधीही पार पडले होते. त्या रात्री फोनवर झालेल्या संभाषणादरम्यान असे काय घडले की बिट्टूने मृत्यूला जवळ केले, हे अद्याप एक गूढच आहे. आई-वडिलांचा आधार असलेला मुलगा गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांनीही या घटनेवर आश्चर्य व्यक्त केले आहे.

हे ही वाचा : 'तुमची मुलगी गरोदर...', पोटात येऊ लागल्या कळा, नराधमाकडून 14 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

पोलीस तपासताहेत सीडीआर

भगवानपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख सत्येंद्र कुमार सत्यार्थी यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी ही आत्महत्या प्रेमप्रकरण किंवा लग्नाशी संबंधित वादातून झाली असावी असा संशय आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी हाजीपुर सदर रुग्णालयात पाठवला आहे. पोलीस आता बिट्टूच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स (CDR) तपासत असून त्याच्या होणाऱ्या बायकोसोबत झालेल्या शेवटच्या संभाषणाविषयी तपास करत आहेत. अद्याप कुटुंबाकडून कोणतीही लेखी तक्रार दाखल झालेली नसली तरी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.