काका परदेशात अन् इकडे पुतण्याने काकीसोबत केलं कांड, नेमकं काय घडलं?

एका पुतण्याने आपल्या काकीची निर्घृण हत्या केली आहे. यामुळे गावात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 03:38 PM • 17 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

काका परदेशात अन् पुतण्याने इकडे काकीसोबत केलं कांड

point

नेमकं काय घडलं?

Crime News : उत्तर प्रदेशमधील देवरिया जिल्ह्यात कौटुंबिक वादाने भीषण रूप धारण केले असून, एका पुतण्याने आपल्याच काकीची हत्या केली. बुधवारी (15 एप्रिल) उशिरा रात्री दोन कुटुंबांमधील वाद इतका वाढला की त्याचे रूपांतर हिंसेत झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताची ओळख 42 वर्षीय रवीता देवी म्हणून झाली आहे, ज्या उमेश विश्वकर्मा यांच्या पत्नी होत्या. उमेश सध्या कामानिमित्त परदेशात असतात. असे सांगितले जात आहे की, जुन्या वादावरून त्यांच्यात भांडण सुरू होते.

हे वाचलं का?

फावड्याने केला हल्ला

वाद सुरु असतानाच रागाच्या भरात येऊन आरोपी तरुणाने रवीता देवी यांच्यावर फावड्याने हल्ला केला. त्याने त्यांच्या डोक्यावर आणि मानेवर अनेक वार केले, ज्यामुळे त्या गंभीर जखमी होऊन जागीच कोसळल्या. घटनेदरम्यान दोन मुले मध्यस्थी करण्यासाठी पोहोचली, परंतु ती देखील जखमी झाली. घटनेनंतर नातेवाईक आणि स्थानिक लोकांनी रवीता देवी यांना तातडीने महर्षी देवराहा बाबा मेडिकल कॉलेजमध्ये नेले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

हे ही वाचा : मोठी बातमी! पिकलेले केस अन् तोंडाला मास्क, वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

घटनेनंतर आरोपी फरार

या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संजय रेड्डी आणि महुआडीह पोलीस ठाण्याचे प्रभारी अमित कुमार राय पोलीस दलासह गावात पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांनी सांगितले की, मुख्य आरोपी घटनेनंतर फरार झाला आहे, तर त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

हे ही वाचा : संसदेत महाचर्चा सुरु असतानाच सरकारकडून अधिसूचना, मध्यरात्रीच लागू झाला महिला आरक्षण कायदा 2023

गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त

पोलिसांचे म्हणणे आहे की, हत्येची ही घटना कौटुंबिक वादाचा परिणाम आहे. आरोपीच्या शोधासाठी सतत छापेमारी केली जात असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल. मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवण्यात आला असून गावात खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.