पुण्यात भयंकर घटना, 22 वर्षीय सायलीच्या ओठावर राहुलने केले चाकूने वार.. नेमकं काय घडलं?

Pune Crime: 14 एप्रिलला सायली तिच्या मैत्रिणीसोबत औंध रोडवरील चौकात बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाला गेली होती. कार्यक्रम संपल्यानंतर घरी परतत असताना पती राहुलने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला.

husband attacks wife while divorce proceedings are underway stabs her with knife accused husband arrested

Pune Crime

मुंबई तक

• 07:00 AM • 17 Apr 2026

follow google news

पुणे: पुण्यातील खडकी परिसरात घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू असतानाच पतीने पत्नीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती कार्यक्रमादरम्यान घडलेल्या या प्रकारात महिलेवर चाकूसदृश धारदार हत्याराने वार करण्यात आले असून ती गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी खडकी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

हे वाचलं का?

नेमकं प्रकरण काय?

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राहुल महादेव कांबळे (वय 30, रा. बाराथे वस्ती, बोपोडी) असे आहे. याबाबत सायली सयाजी भिसे (वय 22, रा. पडयाळ वस्ती, आंबेडकर चौक, औंध रोड, खडकी) हिने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

हे ही वाचा>> शेजारणीचं 5 वर्षांपासून प्रेमसंबंध, प्रियकराच्या होणाऱ्या बायकोवर प्रेयसीनं ॲसिड फेकलं, वधू वेदनेनं विव्हळू लागली

पोलिसांच्या माहितीनुसार, सायली भिसे आणि राहुल कांबळे यांचा काही काळापूर्वी आळंदी येथे विवाह झाला होता. त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ते चर्चेत आले होते. मात्र, वैवाहिक वादामुळे दोघे वेगळे राहत असून, त्यांचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात प्रलंबित आहे.

14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त औंध रोडवरील डॉ. आंबेडकर चौक येथे आयोजित कार्यक्रमाला सायली भिसे आपल्या मैत्रिणीसोबत उपस्थित होती. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री घरी परतत असताना सुमारे पावणे बारा वाजण्याच्या सुमारास राहुल कांबळे त्यांच्या समोर आला.

हे ही वाचा>> लेकाच्या समलैंगिक प्रेमसंबंधाला विरोध, प्रियकराने मित्राच्या आईला संपवलं, पुढे भयंकर...

यावेळी त्याने सायलीला मारहाण करण्यास सुरुवात केली. तिने प्रतिकार केल्यावर आरोपीने चाकूसारख्या धारदार हत्याराने कपाळ, गाल, खांदा, पाठ आणि ओठाखाली वार करत सायलीला जखमी केले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) किरण गायकवाड आणि पोलीस उपनिरीक्षक फिरोज शेख यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रे हाती घेतली. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार प्रिया रोकडे करीत आहेत.