पॅरिस: फ्रान्समधील एका गावात राहणारी एक महिला शेतकरीण तिच्यासोबत घडलेल्या एका घटनेमुळे भयभीत झाली होती. शेती करण्यासोबतच, ती अनेक मेंढ्या आणि बकऱ्याही पाळते. तिच्या लक्षात आले की, रात्री उशिरा कोणीतरी तिच्या बकऱ्यांच्या वाड्यात शिरून त्यांच्यासोबत दुष्कृत्य करत होता.
ADVERTISEMENT
या प्रकरणात, एका 19 वर्षीय तरुणाला त्या महिलेने तिच्या बकऱ्यांसोबत दुष्कर्म करताना रंगेहाथ पकडले. बकऱ्यांवर एकापाठोपाठ अनेकदा दुष्कृत्य केल्याच्या संशयावरून आरोपी तरूणाला अटक करण्यात आली. गुन्ह्याशी त्याचा संबंध जोडणारे डीएनए पुरावे असूनही, तो स्वतःला निर्दोष असल्याचा दावा करत आहे.
डेली स्टारच्या वृत्तानुसार, दक्षिण फ्रान्समध्ये एक फार्म चालवणाऱ्या कॅसँड्राने सांगितले की, एक घुसखोर तिच्या बकऱ्यांवर लैंगिक अत्याचार करत असल्याचे लक्षात आल्यानंतर, गेल्या दोन महिन्यांपासून तिला नीट झोप लागत नव्हती. कॅसँड्रा सॉर्टिनो सांगते की, 11 फेब्रुवारी रोजी तिला या भयंकर गोष्टीबद्दल पहिल्यांदा समजले. तेव्हा तिच्या लक्षात आले की एका बकरीच्या पायाला दोरी बांधलेली आहे.
बकऱ्या झाल्या गंभीर जखमी
कॅसँड्राने स्पष्ट केले, "मला वाटले की कोणीतरी चोर असावा. पण पुढच्या काही आठवड्यांत, कॅसँड्राच्या लक्षात आले की तिच्या अनेक बकऱ्या रात्रभर बांधून ठेवलेले होते. त्या बकऱ्या भयंकर जखमांनी त्रस्त होते. मला वाटले की काहीतरी गडबड आहे आणि या जखमा नर बकऱ्यांमुळे होऊ शकत नाहीत." कॅसँड्राने या सर्व त्रासदायक घटनांची नोंद ठेवायला सुरुवात केली आणि अत्याचार झालेल्या सर्व प्राण्यांची स्थानिक पशुवैद्यकाकडून तपासणी करून घेतली.
हे ही वाचा>> 'ही माझी औलाद आहे की नाही?' बापाच्या मनात संशयाचं भूत, 6 वर्षीय चिमुरड्याचा नदीत फेकून जीव घेतला
गुन्हेगाराला रंगेहाथ पकडण्याच्या आशेने तिने सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला. कॅसँड्रा म्हणाली, "तो आमच्या ओळखीचा कोणी आहे का, हे आम्हाला पाहायचे होते. आमच्या मनात अनेक प्रश्न होते, पण उत्तरे मिळत नव्हती. आम्ही वेडे होत आहोत असे आम्हाला वाटत होते."
तो तरुण तीन आठवडे काही तिथे आला नाही. या काळात, कॅसँड्रा आणि तिची मुलगी अत्यंत सतर्क राहिल्या. पण 20 मार्चला तो तिथे आला. कॅसँड्रा म्हणाली की त्याने पुन्हा एका लहान बकरीवर लैंगिक अत्याचार केला आणि तिला गंभीर जखमी केले. तिचा जीव धोक्यात होता. सीसीटीव्ही रेकॉर्डिंगमध्ये एक माणूस बकऱ्यांसोबत लैंगिक अत्याचार करत असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. कॅसँड्रा म्हणाली की व्हिडिओमध्ये एक माणूस स्पष्टपणे दिसत होता. "जणू काही तो आमच्यावर नजर ठेवून होता. तो प्रत्येक वेळी आपली पद्धत बदलायचा आणि कॅमेऱ्यापासून लपण्याचा प्रयत्न करायचा."
हे ही वाचा>> 'तुमची मुलगी गरोदर...', पोटात येऊ लागल्या कळा, नराधमाकडून 14 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
पोलिसांनी तरुणाला केली रंगेहाथ अटक
अनेक आठवडे शेतावरील सीसीटीव्ही रेकॉर्ड तपासल्यानंतर, 9 एप्रिल रोजी गुन्हेगार अखेर रंगेहाथ पकडला गेला. कॅसँड्राने तिच्या सुरक्षा कॅमेऱ्यात त्या माणसाला पाहिल्यानंतर रात्री सुमारे साडेदहा वाजता पोलिसांना फोन केला आणि अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. तिला आठवले की रात्री साडेदहा वाजता, व्हिडिओमध्ये तो तिथे दिसला होता. संशयिताला शेतातील बकऱ्या ठेवलेल्या ठिकाणीच पकडण्यात आले, पण अटक करणाऱ्या अधिकाऱ्यांसमोरही त्याने आपण निर्दोष असल्याचा आग्रह धरला आणि आपण "वेडा" असल्याचेही म्हटले.
ADVERTISEMENT











