'तुमची मुलगी गरोदर...', पोटात येऊ लागल्या कळा, नराधमाकडून 14 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

Crime News : माणुसकीला काळिमा फासणारा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 14 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले, त्यानंतर पीडिता गर्भवती राहिली. या घटनेची माहिती पीडितेच्या कुटुंबीयांना समजताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पीडितेला डॉक्टरांकडे नेले असता, हा प्रकार उघडकीस आला.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 01:47 PM • 16 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार उघडकीस

point

मुलीला पोटदुखीचा त्रास होऊ लागला अन् मुलगी गर्भवती राहिली

Crime News : माणुसकीला काळिमा फासणारा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 14 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले, त्यानंतर पीडिता गर्भवती राहिली. या घटनेची माहिती पीडितेच्या कुटुंबीयांना समजताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पीडितेला डॉक्टरांकडे नेले असता, हा प्रकार उघडकीस आला. हे प्रकरण हरियाणातील सेक्टर 32 पोलीस ठाणे परिसरातील आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : महालक्ष्मी राजयोग 2026: चंद्र आणि मंगळाच्या युतीमुळे 'या' राशीतील लोकांचे नशीब बदलणार

मुलीवर लैंगिक शोषण करून केलं गरोदर

संबंधित प्रकरणात डॉक्टरांनी अल्ट्रासाऊंडचा वापर करत पीडितेचा तपास केला असता, अल्पवयीन मुलगी पाच महिन्यांची गरोदर राहिली असल्याचे आढळून आले. पोलीस आणि केंद्रीय महिला कल्याण आयोगाला तात्काळ याबाबत कळवण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असता, अल्पवयीन मुलगी पाच महिन्यांची गरोदर राहिल्याची माहिती समोर आली. पोलिसांना आणि केंद्रीय महिला कल्याण आयोगाला तात्काळ कळवण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीची ओळख अद्याप समोर आली नाही. अल्पवयीन मुलीला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुलीला पोटदुखीचा त्रास होऊ लागला अन् मुलगी गर्भवती राहिली

पोलिसांच्या तक्रारीत, अल्पवयीन मुलीच्या आईने सांगितलं की, 9 एप्रिल रोजी सकाळी तिच्या मुलीला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला सांगितलं की, महिला गर्भवती राहिली होती. ती घरी गेली असता, तिने आपल्या मुलीला विचारले, पण तिने याबाबत काहीही सांगितले नाही. 

हे ही वाचा : ज्या मुलीसोबत लग्न होणार, त्याच मुलीच्या शेजारणीला आवडायचा नवरदेव, लग्नाआधीच अ‍ॅसिड फेकलं

नंतर, अल्पवयीन मुलीला 12 एप्रिल रोजी एका सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, सेक्टर 32 पोलीस ठाणे प्रभारी सतीश यांनी सांगितलं की, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.