बॉयफ्रेंडने निर्जनस्थळी नेऊन अत्याचार करुन गेला, पीडितेच्या मदतीसाठी आलेल्या तरुणानेही अब्रू लुटली, शेवटी केला मर्डर

Crime News : तरुणीला एकटे पाहून शुभम कुमार सिंह नावाचा दुचाकीस्वार तिथे आला आणि त्याने मदतीचा बहाणा केला. सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचे आश्वासन देऊन त्याने तरुणीला आपल्या दुचाकीवर बसवले आणि पारादीप येथील आपल्या भाड्याच्या खोलीवर नेले. पोलीस अधीक्षक अंकित कुमार वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभमने तरुणीला इमारतीच्या छतावर नेऊन तिच्यावर पुन्हा बलात्कार केला.

Crime News :

Crime News :

मुंबई तक

02 Mar 2026 (अपडेटेड: 02 Mar 2026, 12:02 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बॉयफ्रेंडने निर्जनस्थळी नेऊन अत्याचार करुन गेला

point

पीडितेच्या मदतीसाठी आलेल्या तरुणानेही अब्रू लुटली, शेवटी केला मर्डर

Crime News : ओडिशाच्या जगतसिंहपूर जिल्ह्यातून एक अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. एका 23 वर्षीय तरुणीवर एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिला चार मजली इमारतीवरून खाली फेकून देण्यात आले. या हृदयद्रावक घटनेत तरुणीचा मृत्यू झाला असून, पोलिसांनी याप्रकरणी तिचा प्रियकर आणि एका अन्य नराधमाला अटक केली आहे. ही घटना 22 फेब्रुवारी रोजी घडली असून, आरोपींविरुद्ध अपहरण, बलात्कार आणि हत्येसह भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

22 फेब्रुवारीच्या सकाळी ही तरुणी आपल्या घरातून प्रियकर सोमनाथ ओझा याच्यासोबत लग्न करण्याच्या उद्देशाने बाहेर पडली होती. सोमनाथने तिला लग्नाचे आमिष दाखवून जगतसिंहपूर येथील सरला मंदिरात बोलावले होते. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर त्याने लग्नाऐवजी तिला एका निर्जन स्थळी नेले. तिथे तिच्यावर अत्याचार केल्यानंतर आरोपी सोमनाथने तिला रहमा बसस्थानकावर असहाय्य अवस्थेत सोडून तिथून पळ काढला. प्रियकरानेच घात केल्यामुळे पीडिता तासनतास बसस्थानकावर गोंधळलेल्या आणि रडत असलेल्या स्थितीत उभी होती.

हेही वाचा : धाराशिव : काकाने पुतणीला गळा दाबून संपवलं, कोयत्याने तुकडे करुन मृतदेह चारीमध्ये पुरला, हत्येचं कारणही समोर

तरुणीला एकटे पाहून शुभम कुमार सिंह नावाचा दुचाकीस्वार तिथे आला आणि त्याने मदतीचा बहाणा केला. सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचे आश्वासन देऊन त्याने तरुणीला आपल्या दुचाकीवर बसवले आणि पारादीप येथील आपल्या भाड्याच्या खोलीवर नेले. पोलीस अधीक्षक अंकित कुमार वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभमने तरुणीला इमारतीच्या छतावर नेऊन तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. आपला गुन्हा उघड होऊ नये या भीतीने त्याने पीडितेचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर तिला चार मजली इमारतीवरून खाली ढकलून दिले, ज्यात तिचा जागीच मृत्यू झाला.

दुसरीकडे, तरुणी घरी न परतल्याने तिच्या भावाने 23 फेब्रुवारी रोजी तिरतोल पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्याच दिवशी तिचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, तपासादरम्यान सत्य समोर आल्यानंतर 25 फेब्रुवारी रोजी भावाने पारादीप मॉडेल पोलीस ठाण्यात बलात्कार आणि हत्येची लेखी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांची दुचाकी आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत.

या घटनेमुळे संपूर्ण ओडिशात संतापाची लाट असून स्थानिक नागरिकांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास पूर्ण केला असून, दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

'मी तुझं नाव लिहून जात नाहीये..' बायकोच्या अनैतिक संबंधांना वैतागून तरुणाची आत्महत्या; बायकोला केला शेवटचा मेसेज
 

    follow whatsapp