Viral Video: सध्या, सोशल मीडियावर एका जोडप्याचा प्रायव्हेट क्षण असलेला 19 मिनिटे 34 सेकंदाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात चर्चेत असल्याचं पाहायला मिळतंय. या व्हिडीओमध्ये ते जोडपं आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहे. आता, 19 मिनिटे 34 सेकंदाच्या या व्हिडीओबाबत पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. जे लोक हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर सर्च, डाउनलोड आणि शेअर करत आहेत, त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे.
ADVERTISEMENT
या व्हायरल व्हिडीओच्या अधिकृत स्त्रोताची माहिती अद्याप मिळाली नसून हा व्हिडीओ एआय (AI) च्या मदतीने बनवला गेला असल्याचा अनेकांचा अंदाज आहे. जोडप्याचा प्रायव्हेट क्षण असलेला हा व्हिडीओ नोव्हेंबरच्या अखेरीस सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये संबंधित जोडपं आक्षेपार्ह अवस्थेत दिसून येत असून हा व्हिडीओ त्यांच्याकडून अनावधानाने रेकॉर्ड झाल्याचा दावा देखील करण्यात येत आहे. तसेच, हा व्हिडीओ AI जनरेटेड असल्याचं देखील बोललं जात आहे. इतकेच नव्हे तर, पार्ट 2 आणि पार्ट 3 च्या नावाने सुद्धा हा व्हिडीओ एडिट करून शेअर केला जात आहे.
हे ही वाचा: Govt Job: भारतीय सैन्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी! इंडियन आर्मीच्या नव्या प्रोग्रामसाठी लवकरच करा अप्लाय...
व्हिडीओ AI जनरेटेड असल्याचा पोलिसांचा दावा
आता या प्रकरणासंबंधी पोलिसांनी बुधवारी (10 डिसेंबर) माहिती देताना सांगितलं की, 19 मिनिटांचा हा व्हिडीओ एआय जनरेटेड असून तो इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि ट्विटर अशा सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल होत आहे. ते म्हणाले की, 'siteengine.com' वर जाऊन संबंधित व्हिडीओ किंवा फोटो AI जनरेटेड आहे की नाही? याचा शोध घेता येतो. पुढे अधिकाऱ्यांनी माहिती देत सांगितलं की, अशाप्रकारचे व्हायरल आणि आक्षेपार्ह व्हिडीओ शेअर करणं टाळलं पाहिजे. असे व्हिडीओ शेअर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, कोणत्याही व्यक्तीच्या गोपनीयतेचं उल्लंघन करणं किंवा प्रायव्हेट फोटो शेअर केल्याने कायदेशीर अडचणीत अडकू शकतात.
हे ही वाचा: महिलेचे विवाहबाह्य संबंध, प्रियकराकडून गर्भवती राहायचं होतं पण... अनैतिक संबंधातून भयंकर घटना!
आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
पुढे ते म्हणाले की, असे आक्षेपार्ह व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायदा 2000 च्या कलम 67, कमल 67 A आणि कलम 66 अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. या कलमांतर्गत गुन्हेगाराला दोन लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
1. आयटी कायद्याचे कलम 66: संगणकाशी संबंधित गुन्हे- तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास, 5 लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही.
2. आयटी कायद्याचे कलम 67: इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अश्लील व्हिडीओ किंवा फोटो प्रसारित करणे- तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांपर्यंत दंड
3. आयटी कायद्याचे कलम 67A: लैंगिकदृष्ट्या स्पष्ट कृत्ये असलेली इलेक्ट्रॉनिक साम्रगी प्रकाशित किंवा प्रसारित करणे- 5 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांचा दंड.
या कलमांतर्गत वारंवार गुन्हे केल्यास 7 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
ADVERTISEMENT











