'मी तुझं नाव लिहून जात नाहीये..' बायकोच्या अनैतिक संबंधांना वैतागून तरुणाची आत्महत्या; बायकोला केला शेवटचा मेसेज

Crime News : पत्नीचे इतर पुरुषांशी असलेले अनैतिक संबंध आणि तिच्याकडून होणाऱ्या सततच्या मानसिक छळाला कंटाळून एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली संबंधित पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे.

crime news

crime news

मुंबई तक

• 08:22 AM • 02 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

'मी तुझं नाव लिहून जात नाहीये..

point

बायकोच्या अनैतिक संबंधांना वैतागून तरुणाची आत्महत्या

point

बायकोला केला शेवटचा मेसेज

Crime News : पत्नीचे इतर पुरुषांशी असलेले अनैतिक संबंध आणि तिच्याकडून होणाऱ्या सततच्या मानसिक छळाला कंटाळून एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली संबंधित पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. मध्य प्रदेशातील जबलपूर मधील ही घटना आहे. दीपक वर्मा असं मृत तरुणाचं नाव आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : मधुचंद्राच्या रात्री नवऱ्यावर चाकूने हल्ला केला अन् काकासोबत पळाली नववधू, काकावर जडला होता जीव

पत्नीचे इतर पुरुषांशी अनैतिक संबंध

दीपकने गेल्या महिन्यात आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याने घरातील पंख्याला चादर बांधून गळफास घेतला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून तपास सुरू केला होता. तपासादरम्यान मृताच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवण्यात आले. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपकची पत्नी विवाहित असूनही तिचे इतर पुरुषांशी अनैतिक संबंध होते. दीपकने अनेकदा तिला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने आपल्या वागण्यात बदल केला नाही. उलट, यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असत.

'तू जाऊन मर..'

गेल्या वर्षभरापासून दीपक या मानसिक त्रासामुळे प्रचंड तणावात होता. तो जेव्हा पत्नीला या गोष्टींपासून रोखत असे, तेव्हा ती त्याला 'तुला जे करायचे ते कर, जाऊन मर,' असे म्हणून टोमणे मारत असे. पत्नीच्या याच सततच्या त्रासामुळे आणि  दीपकने टोकाचे पाऊल उचलले, असा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.

हे ही वाचा : महिलेने रागाच्या भरात लिव्ह इन पार्टरनला ड्रग्ज देऊन त्याचे गुप्तांग कापले, नंतर घटनास्थळावरून काढला पळ

'मी तुझं नाव लिहून जात नाहीये'

आत्महत्येपूर्वी दीपकने व्हॉट्सॲप चॅटमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्याने लिहिले होते की, 'तुझ्यामुळेच मला मरावं लागत आहे, पण मी तुझं नाव लिहून जात नाहीये.' या मेसेजवरून त्याने आपल्या मृत्यूला पत्नीला जबाबदार धरल्याचे स्पष्ट झाले आहे. गोरखपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी नितीन कमल यांनी सांगितले की, चौकशीअंती आरोपी पत्नीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी पत्नी फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
 

    follow whatsapp