काकीने सख्ख्या पुतण्यासोबत घरातून काढला पळ... अनैतिक प्रेमसंबंधाचं धक्कादायक प्रकरण

वृत्तानुसार, एका महिला तिच्या पुतण्यासोबत घर सोडून पळून गेली. अनैतिक संबंधाच्या या धक्कादायक प्रकरणाने गावात एकच खळबळ उडाली आहे. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.

अनैतिक प्रेमसंबंधाचं धक्कादायक प्रकरण

अनैतिक प्रेमसंबंधाचं धक्कादायक प्रकरण

मुंबई तक

• 07:00 AM • 02 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

काकीने सख्ख्या पुतण्यासोबत घरातून काढला पळ...

point

अनैतिक प्रेमसंबंधाचं धक्कादायक प्रकरण

Crime News: उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथून नातेसंबंधाला काळीमा फासणारं खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. वृत्तानुसार, एका महिला तिच्या पुतण्यासोबत घर सोडून पळून गेली. कुर्रा पोलीस स्टेशन हद्दीतील बेगमपूर करहल गावात ही धक्कादायक घटना घडली असून परिसरात एकच गोंधळ उडाल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित कुटुंबीय देखील मोठ्या धक्क्यात असल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, बेगमपुर करहल गावातील रहिवासी असलेल्या अजीत कुमार नावाच्या तरुणाचा आपल्या पत्नीसोबत सुखाचा संसार सुरू होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास त्याची पत्नी सुमन अचानक संशयास्पदरित्या घरातून बेपत्ता झाली. त्यानंतर, कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यास सुरूवात केली पण, सत्य उघडकीस आल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. 

हे ही वाचा: CM देवेंद्र फडणवीस विधानसभेत पुन्हा म्हणाले 'पुन्हा येऊ...', नेमकं काय घडलं?

सख्ख्या पुतण्यासोबत फरार झाली अन्... 

सुमन अचानक घरातून गायब झाल्यानंतर, समोर आलं की, ती तिचा सख्खा पुतण्या हर्षित याच्यासोबत फरार झाली आहे. काकी आणि पुतण्यातील या अनैतिक प्रेमसंबंधामुळे कुटुंब उद्धवस्त झालं. या विश्वासघातामुळे अजित कुमार आणि त्याचं कुटुंब अजूनही या धक्क्यातून सावरलं नाही. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की, ज्या पुतण्यावर त्यांनी इतका विश्वास ठेवला होता, त्यानेच आपल्या काकाचं आयुष्य उद्धवस्त केलं. संबंधित घटनेमुळे कुटुंबाला धक्का बसला आहे. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबईतील बहुप्रतिक्षित बेलासिस उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला... मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पीडित पक्षाने कुर्रा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच, प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी बेपत्ता महिलेची तक्रार नोंदवल्याची माहिती आहे. स्टेशन प्रभारी यांच्या मते, पोलीस पथके दोघांना शोधण्यासाठी शक्य त्या ठिकाणी छापे टाकत आहेत. आरोपींचे मोबाईल लोकेशन देखील ट्रेस केले जात असून लवकरच त्यांना शोधून काढले जाईल आणि या प्रकरणाचं सत्य उघडकीस येईल. 

    follow whatsapp