मुलाच्या डोक्यात हातोड्याने ठोकला अडीच इंचाचा लोखंडी खिळा, वडील अन् भावाचं कृत्य; मुलाचं काय झालं?

Crime News : माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत भीषण घटना समोर आली आहे. गुरुवारी (26 फेब्रुवारी) संध्याकाळी 22 वर्षांचा सुनील नावाचा तरुण रक्ताच्या थारोळ्यात पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला, तेव्हा पोलीसही हादरून गेले. सुनीलच्या डोक्यात चक्क एक अडीच इंच लांबीचा लोखंडी खिळा ठोकलेला होता. आपल्या सख्ख्या वडिलांनी आणि भावानेच झोपेत असताना आपल्या डोक्यात हातोड्याने खिळा ठोकल्याचा खळबळजनक आरोप त्याने केला आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 07:22 AM • 02 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुलाच्या डोक्यात हातोड्याने ठोकला अडीच इंचाचा लोखंडी खिळा

point

वडील अन् भावाचं कृत्य

point

मुलाचं काय झालं?

Crime News : माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत भीषण घटना समोर आली आहे. गुरुवारी (26 फेब्रुवारी) संध्याकाळी 22 वर्षांचा सुनील नावाचा तरुण रक्ताच्या थारोळ्यात पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला, तेव्हा पोलीसही हादरून गेले. सुनीलच्या डोक्यात चक्क एक अडीच इंच लांबीचा लोखंडी खिळा ठोकलेला होता. आपल्या सख्ख्या वडिलांनी आणि भावानेच झोपेत असताना आपल्या डोक्यात हातोड्याने खिळा ठोकल्याचा खळबळजनक आरोप त्याने केला आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. उत्तर प्रदेशातील फिरोझाबाद परिसरातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : पाणीपुरीत विष टाकूत गर्भवतीला मारण्याचा कट, नंतर जंगलात नेलं अन्... हादरवून टाकणारी घटना

झोपेत असतानाच ठोकला खिळा

सुनीलने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कुटुंबात एका प्लॉटवरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. गुरुवारी संध्याकाळी तो आपल्या खोलीत झोपलेला असताना, त्याचे वडील आणि भावाने त्याला अचानक पकडले. काही समजण्यापूर्वीच त्यांनी हातोड्याने त्याच्या डोक्यात अडीच इंच लांब लोखंडी खिळा ठोकला. सुनील वेदनेने विव्हळत होता, ओरडत होता, पण आरोपींना त्याची दया आली नाही. कसाबसा त्यांच्या तावडीतून सुटून तो धावत पोलीस ठाण्यात पोहोचला.

याआधीही ठोकला होता खिळा

या घटनेत सुनीलने आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, त्याच्यावर असा अत्याचार होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी 15 फेब्रुवारी रोजीही आरोपींनी त्याच्या डोक्यात खिळा ठोकला होता. त्यावेळी त्याला 'वेडा' ठरवण्यासाठी आणि या कृत्यावर पांघरूण घालण्यासाठी त्यांनी त्याला नशा मुक्ती केंद्रात पाठवले होते. मात्र, तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्याची स्थिती पाहून त्याला दुसऱ्याच दिवशी पुन्हा घरी सोडून दिले होते.

हे ही वाचा : नागपूर : 8 वर्षांच्या लेकीला बाप दाखवायचा पोर्न, नंतर नको तेच... कोणाला सांगितल्यास द्यायचा 'ती' धमकी

लेखी तक्रार दाखल नाही

या प्रकरणावर पोलिसांनी सांगितले की, जखमी तरुण डोक्यात खिळा असलेल्या अवस्थेत स्वतः पोलीस ठाण्यात आला होता. त्याला तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या प्रकरणी लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही; मात्र तक्रार मिळताच संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी वडील आणि भावावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
 

    follow whatsapp