Crime News : दीराचा आपल्याच वहिनीवर जीव जडला, पण एका क्षुल्लक कारणावरून तिची हत्या करण्यात आल्याचं प्रकरण समोर आलं. या हत्येमागील गुढ आता समोर आलं आहे. पोलिसांनी अवघ्या 48 तासांतच घटनेचा खुलासा केला होता. 10 डिसेंबर रोजी दोघांमध्ये वाद झाला आणि नंतर या घटनेदरम्यान, आरोपीने महिलेच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून, काठीने मारहाण केली आणि नंतर गळा दाबून तिची हत्या करण्यात आल्याचे वृत्त समोर आलं. या प्रकरणातील मेहुण्याचे नाव मुन्नालाल गौर असल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : महाराष्ट्रातून लहान मुलं, मुली पळवल्या जातायत, राज ठाकरेंनी एनसीआरबी अहवालाचा दाखला देत फडणवीसांना सुनावलं..
दीराकडून मेहुणीची हत्या
पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. वृत्तानुसार, 10 डिसेंबर रोजी बनमोर येथील मालती गौर या महिलेची हत्या तिचा प्रियकर आणि दीर मुन्नालाल गौर याने केली होती. बनमोर टीआय दीपेंद्र सिंह यांनी सांगितले की, शाहदपूर सुसानी, पोलीस ठाणे सुमावली येथील रहिवासी मुन्नालाल गौर, सध्या आश्राम वाली गली, बनमोर येथे राहत होता, तो महिलेचा दीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला शहरातील फुलपूर येथील रोडवरून ताब्यात घेण्यात आले.
हत्येचं कारण काय?
चौकशीदरम्यान, मुन्नालालने पोलिसांना सांगितलं की, तो गेल्या चार ते पाच वर्षांपासून मालतीच्या घरी येत होता आणि नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मुन्नालाल हा 10 डिसेंबर रोजी दुपारी मालतीच्या घरी आला तेव्हा त्यांच्यात आर्थिक व्यवहारावरून वाद झाला होता, नंतर दीराने आपल्याच मेहुणीची हत्या केली.
हे ही वाचा : कराड हादरलं! भाच्याने भरचौकात मामावर चाकूने केले वार, हल्ल्यात मामाचा दुर्दैवी अंत
या प्रकरणात आरोपी मुन्नालालने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सीतपूर रोडवरून घटनेत वापरेली लाकडी वॉशिंग मशीन आणि रक्ताळलेले कपडे जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात पोलिसांनी तपास केला असता दिसून आले की, मालती गौरने तिच्या घराच्या बांधकामासाठी बँकेकडून कर्ज घेतले होते. नंतर तिला याच कर्जाची तिला मोठी चिंता लागली होती, मात्र ती चिंता अजूनही प्रलंबित होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहकर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे आरोपी मुन्नालालशी वाद झाला होता, याच प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT











