दोन तरुणींचे समलैंगिक प्रेमसंबंध! एकमेकींसोबत राहण्यासाठी घरातून पळून गेल्या पण शेवटी...

दोन 18 वर्षीय तरुणींचे बऱ्याच काळापासून एकमेकींसोबत प्रेमसंबंध होते. त्यांच्यातील नाते इतकं घट्ट झालं की त्या काही दिवसांपूर्वी दोघी एकमेकींसोबत हरियाणाला पळून गेल्याचं कुटुंबातील सदस्यांचं म्हणणं आहे. पण, शेवटी व्हायचं तेच झालं. नेमकं प्रकरण काय?

दोन तरुणींचे समलैंगिक प्रेमसंबंध!

दोन तरुणींचे समलैंगिक प्रेमसंबंध!

मुंबई तक

• 07:00 AM • 03 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

दोन तरुणींचे समलैंगिक प्रेमसंबंध!

point

एकमेकींसोबत राहण्यासाठी घरातून पळून गेल्या पण शेवटी...

Crime News: उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वृत्तानुसार, दोन तरुणी एकमेकींच्या प्रेमात पडल्या आणि शुक्रवारी आपल्या प्रेमासाठी त्यांचा त्यांच्या कुटुंबियांसोबत भररस्त्यात मोठा वाद झाला. त्यावेळी, स्थानिकांची सुद्धा मोठी गर्दी जमल्याचं पाहायला मिळालं. सामाजिक बंधनांना झुगारून दोघांनी हातात हात घालून एकमेकींसोबत राहण्याची शपथ घेतली. कुटुंबियांच्या विरोधात जाऊन त्या दोघी एकत्रच जगण्या-मरण्यावर ठाम राहिले. मात्र, या प्रेमकहाणीला पुढे वेगळं वळण मिळालं आणि थेट पोलिसांपर्यंत पोहोचलं. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या. 

हे वाचलं का?

एकत्र राहण्यासाठी घरातून पळून गेल्या अन्... 

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या दोन 18 वर्षीय तरुणींचे बऱ्याच काळापासून एकमेकींसोबत प्रेमसंबंध होते. त्यांच्यातील नाते इतकं घट्ट झालं की जवळपास तीन महिन्यांपूर्वी त्या दोघी एकमेकींसोबत हरियाणाला पळून गेल्याचं कुटुंबातील सदस्यांचं म्हणणं आहे. त्यावेळी कुटुंबियांनी आपल्या बेपत्ता मुलींची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. बराच प्रयत्न केल्यानंतर, पोलिसांनी त्यांना शोधून काढले आणि त्यांच्या कुटुंबियांकडे दोघींना परत केले. त्यानंतर, कुटुंबियांनी त्यांना एकमेकींसोबत वेगळं करण्याचा खूप प्रयत्न केला.  

हे ही वाचा: मुंबईची खबर : मुंबईकरांनो लक्ष द्या! 1 मार्चपासून बेस्ट (BEST) बस सेवेत मोठे बदल...

या घटनेनंतर, एका तरुणीच्या कुटुंबियांनी तिला एका दूरच्या नातेवाईकाच्या घरी पाठवलं. मात्र, ती दोन दिवसांपूर्वीच फिरोजाबादला परतली. परतल्यानंतर त्या दोघींनी पुन्हा पळून जाण्याचा कट रचल्याचं वृत्त आहे. शुक्रवारी सकाळी घराबाहेर पडताच त्यांच्या कुटुंबियांना संशय आला. त्यांनी लगेच त्यांचा पाठलाग केला आणि उत्तर पोलिस ठाण्याजवळ त्यांना पकडलं. 

हे ही वाचा: पुणे : अमेरिकेत शिकलेल्या अन् तगड्या पगाराच्या मुलाशी लग्न, पण 3 महिन्यातच तरुणीने इमारतीवरुन उडी मारून जीव दिला

प्रकरण थेट पोलिसांत... 

कुटुंबियांनी दोन्ही महिलांना घरी परतण्यासाठी राजी करण्याचा आणि दबाव आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यावेळी वाद इतका वाढला की त्यांनी भररस्त्यात कुटुंबियांना स्पष्टपणे विरोध केला आणि त्यांचं ऐकण्यास नकार दिला. त्या कोणत्याही परिस्थितीत वेगळे होण्यास तयार नव्हत्या. दोघींनीही स्पष्टपणे सांगितलं की त्या प्रौढ आहेत आणि त्या स्वतःच्या इच्छेने एकत्र राहू इच्छितात. कौटुंबिक दबाव आणि सामाजिक भीती असूनही, त्या एकमेकींसोबत राहण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्या. दरम्यान, रस्त्यावरील वाढत्या गोंधळामुळे आणि गर्दीमुळे, हे प्रकरण पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यात आलं. संबंधित कुटुंब सध्या कायदेशीर कारवाई टाळण्याचा प्रयत्न करीत आहे. बदनामीच्या भीतीने, कुटुंब यातून वैयक्तिक तोडगा काढण्याचा आणि तरुणींना समजावण्याचा प्रयत्न करत आहे. पोलीस देखील परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती समोर आली आहे. 

    follow whatsapp