बायकोला रील्स बनवण्याचं वेड, वैतागलेल्या नवऱ्यानं गळा आवळून संपवलं; हत्येआधी बनवलेला व्हिडीओ व्हायरल

मुंबई तक

03 Mar 2026 (अपडेटेड: 03 Mar 2026, 08:49 AM)

Crime News : इंस्टाग्राम रील बनवण्यावरून झालेल्या वादातून पतीने आपल्य 32 वर्षीय पत्नीची गळा दाबून हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. धक्कादायक म्हणजे महिलेची आणि तिच्या नवऱ्याची पाच वर्षांपूर्वी सोशस मीडियामार्फतच ओळख झाली होती. या ओळखीचं प्रेमात रुपांतर झालं आणि दोघांनी लग्न केलं.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

बायकोला रील्स बनवण्याचं वेड

point

वैतागलेल्या नवऱ्यानं गळा आवळून संपवलं

point

हत्येआधी बनवलेला व्हिडीओ व्हायरल

Crime News : सोशल मीडियावर रील बनवण्याचे वेडापायी एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. इंस्टाग्राम रील बनवण्यावरून झालेल्या वादातून पतीने आपल्य 32 वर्षीय पत्नीची गळा दाबून हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. धक्कादायक म्हणजे महिलेची आणि तिच्या नवऱ्याची पाच वर्षांपूर्वी सोशल मीडियामार्फतच ओळख झाली होती. या ओळखीचं प्रेमात रुपांतर झालं आणि दोघांनी लग्न केलं. बिहारच्या हाजीपूर परिसरातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : रात्री मोबाईलवरून झाला वाद, उडी मारत महिलेनं जीवन संपवल्याचा संशय, अंगणात आढळला मृतदेह

पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह

अंजली आणि कुंदन शाह यांच्या संसाराची सुरुवात सोशल मीडियावरून झाली होती. अंजलीचे पहिले लग्न 12 वर्षांपूर्वी झाले होते आणि तिला त्या लग्नापासून दोन मुलेही होती. मात्र, पाच वर्षांपूर्वी तिची ओळख फेसबुकवर कुंदनशी झाली आणि प्रेमात पडल्यानंतर तिने आपल्या पहिल्या पतीला सोडून कुंदनशी दुसरे लग्न केले. मात्र, लग्नानंतर काही काळातच त्यांच्यात वाद सुरू झाले. अंजलीला सोशल मीडियावर रील बनवण्याची आवड होती, जी कुंदनला मान्य नव्हती, यावरून त्यांच्यात वारंवार भांडणे होत असत, अशी माहिती समोर आली आहे.

व्हिडीओ पोस्ट करत नवऱ्यावर आरोप

धक्कादायक बाब म्हणजे, हत्येच्या अवघ्या २४ तास आधी अंजलीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये तिने पती कुंदनवर गंभीर आरोप केले होते आणि त्याच्यासोबत केलेले प्रेमविवाह ही आपल्या आयुष्यातील मोठी चूक असल्याचे रडत रडत सांगितले होते. अंजलीच्या मुलाने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, घटनेच्या वेळी पती-पत्नीत जोरदार वाद झाला आणि रागाच्या भरात कुंदनने नायलॉनच्या दोरीने अंजलीचा गळा आवळून तिची हत्या केली. पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेली दोरी जप्त केली आहे.

हे ही वाचा : 23 वर्षीय तरुण होळी खेळण्यासाठी घराबाहेर पडला, पुन्हा घरी परतला नाही, विहिरीत बॉडी...

छळ केल्याचा आरोप

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मार्टमसाठी पाठवला असून फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. मृत अंजलीच्या माहेरच्या लोकांनी आरोप केला आहे की, कुंदन आणि त्याच्या कुटुंबीयांनी मिळून अंजलीचा छळ केला आणि तिची हत्या केली. सध्या पोलीस आरोपी पतीची कसून चौकशी करत असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. सोशल मीडियावरून सुरू झालेले हे प्रेमप्रकरण अखेर एका दुर्दैवी हत्येने समाप्त झाले आहे.