मद्यधुंद तरुणांचे रिक्षाचालकासोबत अश्लील चाळे, 'त्या' गोष्टीला विरोध केल्याने हत्या; गटारात सापडला मृतदेह

Crime News : एका रिक्षाचालकाची दोन प्रवाशांनी निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रवासी रिक्षाचालकासोबत अश्लील चाळे करत होते. त्याला विरोध केल्यामुळेच त्याची हत्या झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. रिक्षाचालकाच्या भावाने तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनंतर तपास चालू असताना एका नाल्यात रिक्षाचालकाचा मृतदेह आणि कपडे आढळून आले होते.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 09:34 AM • 03 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

मद्यधुंद तरुणांचे रिक्षाचालकासोबत अश्लील चाळे

point

'त्या' गोष्टीला विरोध केल्याने हत्या

point

गटारात सापडला मृतदेह

Crime News : एका रिक्षाचालकाची दोन प्रवाशांनी निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रवासी रिक्षाचालकासोबत अश्लील चाळे करत होते. त्याला विरोध केल्यामुळेच त्याची हत्या झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. रिक्षाचालकाच्या भावाने तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनंतर तपास चालू असताना एका नाल्यात रिक्षाचालकाचा मृतदेह आणि कपडे आढळून आले होते. पोस्ट मार्टम अहवालात मृत्यूचे कारण पाण्यात बुडाल्याने असल्याचे समोर आले असले, तरी शरीरावरील जखमांमुळे हत्येचा संशय बळावला होता. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ही घटना आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : बायकोला रील्स बनवण्याचं वेड, वैतागलेल्या नवऱ्यानं गळा आवळून संपवलं; हत्येआधी बनवलेला व्हिडीओ व्हायरल

तरुणांसोबत मद्यप्राशन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी संपूर्ण मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, रिक्षात दोन तरुण चालकासोबत जाताना दिसले. तपासादरम्यान समोर आले की, रिक्षाचालकाने या तरुणांसोबत दारु प्यायली होती. दारु पिण्यासाठी एक तास थांबल्यानंतर परतत असताना त्यांनी पुन्हा एकदा दारु प्यायली. या नशेच्या अवस्थेत आरोपी तरुणांच्या वासना जागा झाल्या आणि त्यांनी चालकासोबत गैरप्रकार करण्याचा कट रचला.

अनैसर्गिक कृत्याला विरोध केल्याने हत्या

रेल्वे ओव्हरब्रिजवर पोहोचल्यावर दोन्ही आरोपींनी रिक्षाचालकासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला चालकाने विरोध केला नाही, मात्र ब्रिजवरून खाली उतरताच त्याने रिक्षा थांबवून कडाडून विरोध केला. यामुळे संतापलेल्या आरोपींनी चालकाला बेदम मारहाण केली आणि त्याचे कपडे जबरदस्तीने उतरवले. अनैसर्गिक कृत्याला विरोध करत असताना आरोपींनी त्याला उचलून नाल्यात फेकून दिले. रिक्षाचालक आधीच नशेच्या धुंदीत असल्याने आणि पालथा पडल्याने त्याला स्वतःला सावरता आले नाही आणि गुदमरून त्याचा मृत्यू झाला. आपली ओळख पटू नये म्हणून आरोपींनी चालकाची बॅग आणि महत्त्वाची कागदपत्रेही चोरून नेली होती.

हे ही वाचा : दोन तरुणींचे समलैंगिक प्रेमसंबंध! एकमेकींसोबत राहण्यासाठी घरातून पळून गेल्या पण शेवटी...

होळीच्या दिवशीच तुरुंगवास

पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीचे साहित्य जप्त केले आहे. न्यायालयाने या दोघांची रवानगी तुरुंगात केली असून, विशेष म्हणजे होळीच्या सणापूर्वीच ही कारवाई झाल्याने पीडित कुटुंबाला काहीसा दिलासा मिळाला आहे. पीडित कुटुंबाने आरोपींना सणासुदीच्या काळातच शिक्षा व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती आणि योगायोगाने होळीच्या दिवशीच आरोपींची रवानगी तुरुंगात झाली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मद्यप्राशन आणि गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे एका निष्पाप रिक्षाचालकाला आपला जीव गमवावा लागला आहे.
 

    follow whatsapp